PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएचे प्रमुख म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एनडीएला सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्तास्थापनेसाठीचं गणित जुळवता आलं नसलं, तरी नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या सहकार्याने मोदींनी हे गणित जुळवून आणलं. या पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथविधी पार पडला असून त्यांच्यासह एनडीएमधील अनेक वरीष्ठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

आधी मोदी, नंतर पहिले पाच मंत्री!

दरम्यान, यावेळी शपथ घेण्याचा निश्चित क्रम ठरलेला होता. त्यानुसार, सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी शपथ घेतली. चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी तर पाचव्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शपथ घेतली. नड्डांच्या नंतर शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

Nana Patole on Eknath Shinde
“राज्याचे मुख्यमंत्री गंभीर माणूस नाहीत, खुर्ची वाचवणं हेच…”, नाना पटोलेंची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका
What Eknath Shinde Said?
“एकदा मार खाल्लाय,आता ताकही फुंकून…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सल्ला
Andhra Pradesh Chief Minister N Chandrababu Naidu meets Prime Minister Narendra Modi in New Delhi
चंद्राबाबू यांची पंतप्रधानांशी चर्चा
Loksatta anvyarth Prime Minister Narendra Modi ministership Chandrababu Naidu
अन्वयार्थ: चंद्राबाबूंचे चोचले चालतील?
Shivsena MP Sanjay Raut
“कोणतंही सरकार बिनचेहऱ्याचं असू नये”, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊतांचं पुन्हा सूचक विधान
ambadas danve on vishwajit kadam
विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या विधानावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा विषय…”
eknath shinde on laxman hakes
लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्यांना…”
kashmira pawar satara arrested forged as pmo appointed
साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!

PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : एकही खासदार, आमदार नाही; तरीही आठवलेंना सलग तिसऱ्यांदा राज्यमंत्रीपद

एकनाथ शिंदेंची पोस्ट काय?

बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो!

गेली दहा वर्षे व्रतस्थपणे देशाच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटणारे, जागतिक पातळीवर भारताला मोठा सन्मान मिळवून देणारे आणि अहोरात्र गरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेले भारताचे भाग्यविधाते, विश्वगुरू नरेंद्र मोदी जी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नवा भारत, श्रेष्ठ भारत घडवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नात आम्ही भक्कम साथ देणार आहोत. भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी नेण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न आता पूर्ण होईल, ही खात्री आहे. गरिबांना, वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास मला वाटतो. अशी पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.

हे पण वाचा- अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद नाही, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपा मित्रपक्षांशी…”

शपथविधी सोहळ्यानंतर जे. पी. नड्डांच्या निवासस्थानी स्नेहभोजन

शपथविधी सोहळ्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या घरी एनडीएतील सर्व नेत्यांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येथे एनडीएतील घटक पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला एंनडीएतील सर्व घटक पक्षांचे नेते तसेच नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री उपस्थित असतील.

जे. पी. नड्डा यांच्या घरी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा मेन्यू देखील खास आहे. यामध्ये सरबत, मिल्कशेक, स्टफ्ड लिची, मटका कुल्फी, आंबे, तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीरसह इतर व्यंजनांचा समावेश आहे. यामध्ये जोधपुरी भाजी, डाळ, दम बिर्यानी आणि पाच प्रकारच्या पोळ्या (चपात्या/रोट्या) असतील. यासह पंजाबी व्यंजनांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाजरीची खिचडी आणि इतर अनेक प्रकारचे सरबत उपलब्ध असतील. यासह ज्यांना मिष्ठान्न आवडतं अशा लोकांसाठी आठ वेगवेगळ्या गोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये रसमलाई, चार प्रकारचे घेवर, चहा आणि कॉफी देखील उपलब्ध असेल.