Three idols of Ram Mandir अयोद्धेतील राममंदिरामध्ये गाभाऱ्यात आता प्रभू श्री रामाची मूर्ती विराजमान झालेली असली तरी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे प्रत्यक्षात तीन मूर्ती मागविण्यात आल्या होत्या. म्हैसूर येथील प्रसिद्ध शिल्पकार अरूण योगिराज यांनी साकारलेली ५१ इंचाची श्रीरामाची बालमूर्ती गाभाऱ्यातील प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आली. याशिवाय गणेश भट आणि सत्यनारायण पांडे यांनी साकारलेल्या श्रीरामाच्या मूर्तीही अयोद्धेतील या राममंदिरासाठी साकारण्यात आल्या होत्या. त्या उरलेल्या दोन मूर्तींचा हा शोध…

भट्ट यांची अदाकारी

गणेश भट्ट हे सध्या ६२ वर्षांचे असून ते कर्नाटकातील इदागुंजी येथील आहेत. यापूर्वी त्यांनी भारतातील अनेक विख्यात मंदिरांसाठी गणपती, विष्णू, हनुमान आणि आदी शंकराचार्यांच्या मूर्ती साकारल्या आहेत. याशिवाय अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी ठिकाणी विदेशातील मंदिरांसाठीही त्यांनी मूर्ती साकारल्या आहेत. भट्ट यांचे वडील पुजारी होते. के. जी. शांतप्पा गुडीगर भट्ट यांनी शिल्पकलेचे प्रारंभिक धडे घेतले. त्यानंतर भारतीय पारंपरिक शिल्पकलेचे प्रगत शिक्षण त्यांनी देवालकुंडा वडिराज यांच्याकडून घेतले. तर शिल्पशास्त्राचे धडे त्यांनी प्रा. एस. के. रामचंद्र राव यांच्याकडून गिरवले

brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
anand dighe s image used by mahayuti
महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
Sangli, Miraj, Women Representative Miraj,
सांगली, मिरजेच्या रणांगणात ‘लाडक्या बहिणी’ची चर्चा ! रिंगणातून बाजूला करण्याचे प्रयत्न
article about loksatta durga award 2024 event celebration
लोककलेच्या गजरात रंगलेला ‘दुर्गा पुरस्कार’
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन

कृष्णशिलेची निवड

रामरायाची मूर्ती साकारण्यासाठी त्यांनी कृष्णशिलेची निवड केली होती. मात्र या मूर्तीची निवड गर्भगृहासाठी होऊ शकली नाही. या बाबत इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना भट्ट म्हणाले की, त्यामुळे मला बिलकूल निराशा आलेली नाही. खरे तर ही स्पर्धाच होती आणि साहजिकच होते की, त्या तीन पैकी कोणत्या तरी एका मूर्तीचीच निवड होणार होती. याचा अर्थ असा मुळीच नाही की, इतरांनी घडविलेल्या मूर्ती चांगल्या नाहीत. प्रत्येकाच्या मनात रामाची एक प्रतिमा असते. माझ्या मनातील प्रतिमा मी साकारली आणि माझ्या दृष्टीने ती सर्वोत्कृष्टच आहे. मी साकारलेली रामरायाची मूर्ती ही पूर्णपणे भारतीय परंपरेनुसारच साकारलेली आहे.

आणखी वाचा: राम कथा अनेक तरी राम नामाचे गारुड सारखेच; काय आहे कारबि रामायण? 

रामकथा आणि तूपाचा दिवा

भट्ट यांनी २०२३ सालच्या मे महिन्यामध्ये ही मूर्ती घडविण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी ज्या कृष्णशिलेतून ही मूर्ती घडविण्यात आली त्या शिळेची विधिवत पूजा करण्यात आली. या मूर्तीचे काम सुरू असताना त्यांनी सातत्याने एक तूपाचा दिवा सतत तेवत ठेवला होता. दिवसातून दोन पूजा- प्रार्थना आणि रामायणातील कथांचे पठण असा त्यांचा दिनक्रम होता. १० डिसेंबरच्या दिवशी त्यांचे शिल्पकृती घडविण्याचे काम पूर्ण झाले. त्यांनी ५४ इंचांची राममूर्ती साकारली आणि ती रामजन्मभूमी ट्रस्टला सादर केली. या संपूर्ण कार्यकाळात ते अयोद्धेमध्येच तळ ठोकून होते. त्यांच्या कार्यशाळेमध्ये त्यांच्या काही शिष्यांचाही समावेश होता. या संपूर्ण कालखंडात केवळ दोनदाच ते त्यांच्या मूळ घरी नातवाला भेटण्यासाठी जाऊन आले.

सव्वाफूटाच्या दोन राममूर्ती

सत्यनारायण पांडे हे ६५ वर्षांचे असून ते मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. मात्र आता त्यांचे कुटुंब राजस्थानात स्थलांतरित झाले आहे. वडील आणि आजोबांकडून त्यांनी शिल्पकलेचे प्राथमिक धडे घेतले. संगमरवरामध्ये मूर्त घडविण्यात कुशल असलेले पांडे हे सत्संगी असून हनुमानभक्त आहेत. मातीची मूर्ती घडविण्यातही ते तेवढेच वाकबगार आहेत. त्यांची शिल्प कार्यशाळा
राजस्थानमध्ये असून त्यांनी साकारलेल्या शिल्पकृतींचे शोरूम तिथेच आहे. सध्या त्यांची दोन मुले त्यांच्या कार्यशाळेचे काम पाहतात. त्यांनी जयपूर येथे श्रीरामाच्या लहान आकारातील अवघ्या सव्वाफूट उंचीच्या दोन मूर्ती पांढऱ्या संगमरवरामध्ये साकारलेल्या होत्या. विश्व हिंदू परिषदेच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने त्या पाहिल्या आणि त्यांना अयोद्धेमध्ये पाचारण करण्यात आले.

तीन शिल्पकारांमध्ये स्पर्धा

२०२२ सालच्या डिसेंबर महिन्यात पांडे यांनी त्यातील एक मूर्ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेट दिली. आणि विहिंपचे कार्यकर्ते पंकज यांना सांगितले की, अयोद्धेच्या राममंदिरातील मूर्ती साकारण्याची त्यांची इच्छा आहे. त्यानंतर पंकज यांनी राजस्थानातील पांडे यांच्या कार्यशाळेसही भेट दिली. दिल्लीत झालेल्या एका बैठकीनंतर, पांडे, भट्ट आणि योगिराज या तिन्ही शिल्पकारांना अयोद्धेमध्ये निमंत्रण देण्यात आले. तिघांनाही मूर्तीच्या आरेखनाबाबत आणि घडणीबाबत काही मार्गदर्शक तत्त्वांची चौकटही घालून देण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या कामास सुरुवात झाली.

सत्संगातील राम

इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना सत्यनारायण पांडे म्हणाले, “आजवर सत्संगामध्ये श्रीरामाबाबत जे जे ऐकले ते मनात ठेवून त्या मन:चित्रातून ही मूर्ती साकारली. पांडे यांनी ही मूर्ती साकारताना सीता राम, श्रीराम या राममंत्राचे पठण केले. अयोद्धेतील शिल्प कार्यशाळेच्या जवळ असलेल्या मंदिरामध्ये त्यांनी यज्ञहवन तर केलेच पण त्याचबरोबर भंडाऱ्याचेही आयोजन केले. पांडे यांनी त्यांच्या बहिणीच्या पाच वर्षांच्या नातवाची २५ वेगवेगळ्या प्रकारची छायाचित्रे टिपली आणि त्यांचा वापर रामाचा निरागसपणा दाखविण्यासाठी केला. पांढऱ्या मकराना संगमरवरामध्ये त्यांनी ही मूर्ती साकारली होती.

मारुतीरायाचे बळ

त्यांचा कनिष्ठ मुलगा त्यांच्याबरोबर त्यांच्या अयोद्धेतील कार्यशाळेत राहिला होता तर मोठा मुलगा जयपूरची कार्यशाळा सांभाळत होता. त्यांनी साकारलेली रामरायाची मूर्ती अयोद्धेच्या राममंदिरातील गाभाऱ्यात विराजमान झालेली नसली तरी त्यांनीच मकराना संगमरवरामध्ये साकारलेल्या जय- विजय, गणपती आणि हनुमान यामूर्ती मात्र याच मंदिरात विराजमान आहेत. तर गुलाबी वालुकाश्मात साकारलेल्या हत्ती, सिंह, हनुमान आणि गरूड या शिल्पकृती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्थापित आहेत. त्यांच्याबरोबर आलेल्या २०० कलावंतांनी या इतर शिल्पकृती साकारण्यास त्यांना मदत केली. राममूर्तीची निवड झालेली नसली तरी त्यामुळे मी निराश नाही उलटपक्षी राममूर्ती साकारण्यासाठी मारुतीरायाने दिलेल्या बळ आणि आत्मविश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे.

त्या दोन मूर्तींनाही तीच ‘प्रतिष्ठा’

विश्व हिंदू परिषदेचे नेते विनोद बन्सल या संदर्भात म्हणाले की, उर्वरित दोन मूर्तींची निवड गाभाऱ्यासाठी झालेली नसली तरी त्यांची प्रतिष्ठा राहील याची काळजी घेण्यात येईल आणि त्या मूर्ती या राममंदिर संकुलाचा भाग असतील. लवकरच त्यांच्यासाठी जागा निश्चित करण्यात येईल. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने या तिन्ही शिल्पकारांना त्यांचे मानधन दिले आहे. तिन्ही मूर्तींचा स्वीकार ट्रस्टने केलेला असून त्यांची प्रतिष्ठा निश्चितपणे राखली जाईल, असेही बन्सल म्हणाले. २०२५ सालच्या डिसेंबर महिन्यापर्यंत मंदिर संकुलाचे काम पूर्ण करण्यात येईल. तोपर्यंत या उर्वरित दोन मूर्तीही या संकुलाचा भाग झालेल्या असतील.