भारत सरकारने हैदराबादमधील बायलॉजिकल ई या कंपनीकडून बनवण्यात येणाऱ्या कोरबीव्हॅक्स (Corbevax) या लसीच्या ३० कोटी डोससाठी अॅडव्हान्स ऑर्डर दिली आहे. ही पूर्णपणे भारतीय बनावटीची लस असण्याबरोबरच अन्य एका कारणासाठी ही लस चर्चेत आहे आणि ते कारण म्हणजे या लसीची किंमत. कोरबीव्हॅक्स ही भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या करोना लसींपैकी सर्वात स्वस्त लस ठरणार आहे. काय आहे नक्की ही लस, लसनिर्मिती करणारी ही कंपनी कोणती आहे आणि ही लस कितीला उपलब्ध होणार आहे हेच समजून घेण्याचा केलेला प्रयत्न. ही लस कधी उपलब्ध होणार? कोरबीव्हॅक्सच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायर्सला परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये या लसीचा फारच चांगला परिणाम दिसून आला आहे. केंद्र सरकार या लसींच्या ३० कोटी डोससाठी दीड हजार कोटी रुपये देणार आहे. कोरबीव्हॅक्स ही सध्या देण्यात येणाऱ्या लसींप्रमाणेच दोन डोसमध्ये दिली जाणारी लस आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट आणि डिसेंबरच्या दरम्यान केंद्र सरकारने दिलेल्या ३० कोटी लसींची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी लसींची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणार आहे. नक्की वाचा >> समजून घ्या : करोनानंतर लहान मुलांना होणारा MIS-C आजार आणि त्याच्या सात लक्षणांबद्दल किंमत किती? कोरबीव्हॅक्स ही भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्वात स्वस्त लसींपैकी असल्याचं सांगण्यात येत आहे. या लसीचे दोन्ही डोसची एकत्रित किंमत ही ४०० रुपयांपेक्षा कमी असल्याचा दावा केला जातोय. कर वगैरे मिळून या लसीचे दोन डोस ५०० रुपयांमध्ये उपलब्ध केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्यात. सध्या भारतामध्ये देण्यात येणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’च्या एका डोसचा दर ३०० ते ४०० रुपये इतका आहे. स्पुटनिक व्हीचा भारतामधील एका डोसचा दर एक हजार रुपये इतका आहे. नक्की वाचा >> अॅण्टीबॉडीज निर्माण करण्यात ‘कोव्हिशिल्ड’ ‘कोव्हॅक्सिन’पेक्षा सरस; संशोधकांचा दावा केंद्र सरकारने काय मदत केली? केंद्र सरकारच्या वतीने पत्र जारी करुन आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरबीव्हॅक्सच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने मदत केली आहे. "बायोटेक्नोलॉजी विभागाने या लसीसाठी ग्रॅण्ट इन एड पद्धतीने १०० कोटींचं आर्थिक पाठबळ देण्याबरोबरच चाचण्यादरम्यान प्राण्यांवर प्रयोग करण्यासाठीही कंपनीला मदत देऊ केली आहे. फरिदाबादमधील ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स टेक्नोलॉजी इन्स्टिटयूटमध्ये यासंदर्भातील प्रयोग सुरु आहेत," असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिकेतील बायलोर कॉलेज ऑफ मेडिसिनने या लसीसंदर्भातील संशोधन केलं आहे. २००२ साली सार्कच्या प्रादुर्भावानंतर यासंदर्भातील संशोधन या कॉलेजमध्ये सुरु करण्यात आलेलं. बायोलॉजिकल ई कंपनीने या संसोधनाचे आणि लसनिर्मितीसाठीचे हक्क २०२० च्या ऑगस्ट महिन्यामध्ये विकत घेतले आहेत. नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का? कोरबीव्हॅक्स नक्की आहे तरी काय? कोरबीव्हॅक्स ही पुनर्संचयित प्रथिनांचा समावेश असलेली रिकॉम्बीनंट प्रोटीन सबयुनीट तंत्रज्ञानावर आधारीत लस आहे. हिपॅटायटीसची लस ज्या आधारावर बनवण्यात येते त्याच पद्धतीने कोरबीव्हॅक्स बनवण्यात आली आहे. त्यामुळेच लस निर्मितीचा साचा हा तपासून पाहण्यात आलेला आणि यशस्वी ठरलेला आहे. मडोर्ना आणि फायझरने तयार केलेल्या एमआरएनए पद्धतीवर आधारित ही लस नाही. एमआरएनएवर आधारित रोगासाठी कारणीभूत असलेल्या विषणूंवर परिणाम करणाऱ्या मडोर्ना आणि फायझरच्या लस या पहिल्यांदाच निर्माण करण्यात आल्यात. यापूर्वी एमआरएनने तंत्रज्ञानावर आधारित एकही लस उपलब्ध नव्हती. जगभरातील गरीब देशांमध्ये लसींचा पुरवठा करण्यासाठी काम करणाऱ्या 'गावी'ने (Gavi) दिलेल्या माहितीनुसार, "सर्व लसी या रोग पसरवरणाऱ्या विषाणूमधील काही अंश शरीरामध्ये सोडून रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या विचारातून तयार करण्यात आलेल्या आहेत. मात्र किती प्रमाणामध्ये हा अंश शरीरामध्ये सोडला जातो याचं प्रमाण प्रत्येक लसीमध्ये वेगळं आहे." नक्की वाचा >> समजून घ्या : करोना विषाणूची उत्पत्ती नक्की कुठे झाली? इतर लसींपेक्षा वेगळी कशी? त्यामुळे एमआरएनएवर आधारित लसींमधून रोग पसरणवणाऱ्या विषाणूंमधील काही ठराविक जेनेटीक कोड शरीरात सोडून रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते. मात्र सबयुनीट तंत्रज्ञानावर आधारित लसी या विषाणूमधील स्पाइक प्रोटिन्सच्या मदतीने ही रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतात. नोव्हल करोनाव्हायरस जे स्पाइक प्रोटीन निर्माण करतो त्यावरुनच त्याला नोव्हल हे नाव पडलं आहे. याच स्पाइक प्रोटीनच्या सहाय्याने हा विषाणू मानवी शरीरातील पेशींशी जोडला जातो. नक्की वाचा >> समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं? नक्की काम कशी करते ही लस? कोरबीव्हॅक्स लस ही मानवी शरीरामध्ये केवळ हे स्पाइक प्रोटिन तयार करण्याचं काम करते. विषाणूला पेशींशी जोडणाऱ्या स्पाइक प्रोटीनच्या निर्मितीनंतर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यास सुरुवात होते. या लसीच्या सुरक्षेसंदर्भात चिंता असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की लसीच्या माध्यमातून संपूर्ण विषाणू शरीरात सोडला जात नसून विषाणूचा शरीरातील पेशींशी संपर्क करणारे स्पाइक प्रोटीन्स निर्माण करणारे घटक म्हणजेच विषाणूचा काही अंशच शरीरात सोडला जातो. तसेच तज्ज्ञांच्या मते विषाणूमधील स्पाइक प्रोटिन्सच्या माध्यमातून आजार पसरत नसल्याने सबयुनीट लसी या खूप सुरक्षित असतात. हॅपटायटस बीवरील उपचारांसाठी याच सबयुनीट प्रोटिन पद्धतीच्या लसीचा वापर केला जातो. नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते? सबयुनीट लसींमध्ये विषाणूचा काही भाग वापरण्यात येत असल्याने त्यापासून निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती सुद्धा कमी प्रमाणात असल्याने लसीबरोबरच रोगप्रतिकारशखती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणारे सहाय्यक घटकही घ्यावे लागतात. कोरबीव्हॅक्ससाठी हे घटक अमेरिकेतील डायनाव्हॅक्स कंपनी बनवत आहे. कोरबीव्हॅक्स लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. अशी लस बनवणं सहज शक्य आहे का? 'गावी'ने (Gavi) दिलेल्या माहितीनुसार, अशा लसी बनवणे हे तुलनेने स्वस्त असते. तसेच या निर्माण करणे सहज शक्य असतं. त्याचप्रमाणे या लसी पूर्ण विषाणूंचा समावेश असणाऱ्या लसींपेक्षा जास्त स्थिर असतात. नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का? हॅपटायटीस बीची लस कशी बनवली जाते याचा संदर्भ देताना 'गावी'ने प्रोटिन सबयुनिटसाठी लागणारा जेनेटिक कोड वेगळा केला जातो. त्यानंतर तो यिस्ट पेशींमध्ये टाकला जातो. यामुळे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. "हे यिस्ट मोठ्या फर्मेंटेड टँकमध्ये निर्माण केलं जातं नंतर ते उघडून त्यामधून प्रोटिन कंपोनंट काढून तो लसीमध्ये वापरला जातो. यामुळे या लसी अधिक स्थिर आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सहाय्यक घटकांची गरज लागणाऱ्या असतात," असं 'गावीने म्हटलं आहे.