ओटीटी हा शब्द आज आपल्यापैकी अनेकांच्या ओळखीचा झालाय. पण ओटीटी म्हणजे नेमकं काय? वर्षिक सबस्क्रीप्शन अगदी २०० पासून ते ३६५ आणि ९९ पासून ते ९९९ रुपयांपर्यंत असणाऱ्या या ओटीटी प्लॅटफॉर्मसवरील चित्रपट काही शे कोटींची कमाई कशी करतात? यासारखे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर तुम्ही अगदी योग्य लेख वाचत आहात कारण आपण या लेखामध्ये ओटीटी म्हणजे काय, ते कमाई कशी आणि कुठून करतात यावर प्रकाश टाकणार आहोत.

ओटीटी म्हणजे काय?
मूळात ओटीटी कमाई कशी करतात हे समजून घेण्याआधी हे माध्यम आहे तरी काय हे समजून घ्यावं लागेल. ‘ओव्हर द टॉप’ असा ओटीटीचा फूलफॉर्म आहे. ओटीटी प्लॅफॉर्म्स हे इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडीओ कंटेंट स्ट्रिमींग करतात. अगदी मजेशीर भाषेत सांगायचं झालं तर या प्लॅटफॉर्म्सने थिएटरच्या कमाईवर डल्ला मारलाय. याचं कारण म्हणजे या प्लॅटफॉर्म्समुळे अनेकांनी हळूहळू चित्रपटगृहांकडे पाठ फिरवायला सुरुवात केलीय. चित्रपपट प्रदर्शित झाल्यानंतर तो काही काळानंतर कोणत्या ना कोणत्या ओटीटीट प्लॅटफॉर्मवर येईलच असा विचार करुन अनेकजण हल्ली थेअटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी जाणं टाळतात.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

करोनाच्या कालावधीमध्येही ओटीटी प्लॅटफॉर्मसला फटका बसला नाही. एकीकडे चित्रपटगृहांना मोठा फटका बसत असतानाच दुसरीकडे करोना कालावधीमध्ये घरी बसून मनोरंजनाचं साधन उपलब्ध करुन देणाऱ्या या प्लॅटफॉर्म्सवरील युझर्स वाढल्याचं दिसून आलं.

ओटीटी नेमकं करतात काय?
ओटीटी माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना आणि चित्रपटांना व्यासपीठ मिळतं. इंटरनेटच्या माध्यमातून वापरकर्ते ओटीटीवरुन कंटेंट पाहू शकतात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या केबल कनेक्शनची गरज लागत नाही. असा एक काळ होता जेव्हा केबल टीव्ही फार लोकप्रिय माध्यम होतं. मात्र आताच्या पिढीला या केबल टीव्हीची आणि वायर्सच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या कंटेंटची गरज वाटत नाही. कारण आज ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरुन मोठ्याप्रमाणात त्यांना वायरलेस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हातातील ५ इंचाची स्क्रीन असणाऱ्या मोबाईलवर कंटेंट उपलब्ध झालाय. पण हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स कमाई कशी करतात?

आर्थिक गणित कसं?
ओटीटी प्लॅटफॉर्म्स अनेक माध्यमातून कमाई करतात. यामध्ये सर्वात सामान्य आणि सर्वांच्या परिचयाचं म्हणजे युझर सबक्रीप्शन. मात्र याशिवायही अनेक माध्यमांमधून ओटीटी प्लॅटफॉर्म्सला पैसे मिळतात. ही माध्यमं कोणती पाहूयात…

सबस्क्रीप्शन : जेवढे जास्त वापरकर्ते तेवढा जास्त पैसा. या माध्यमांवरील कंटेंट पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतात. वार्षिक किंवा मासिक सबस्क्रीप्शनच्या माध्यमातून पैसा उभा केला जातो. ओटीटी प्लॅटफॉर्म या पैशांमधून निर्मात्यांकडून कंटेंट विकत घेतात.

अ‍ॅडव्हर्टाइजमेंट पेजेस : असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत जे मोफत उपलब्ध आहेत. मात्र या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहताना अनेकदा मध्ये जाहिरातीची पानं येतात. या जाहिरातींच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्म्स जाहिरातदारांकडून पैसे घेऊन कमाई करतात.

बाय किंवा रेंट : अनेकदा खास करुन युट्यूबवर एखादा चित्रपट पाहण्यासाठी केवळ त्या चित्रपटासाठी किरकोळ रक्कम मोजवी असा पर्याय दर्शकांना दिला जातो. खास करुन युट्यूवबर असे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात. हे चित्रपट एकदा पाहण्यासाठी किरकोळ रक्कम आकारली जाते याचा रेंट किंवा बाय म्हणजेच विकत घेणं किंवा भाड्यानं घेणं असं म्हणतात.

पैसा गुंतवतात कसा?
हल्ली अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स निर्मात्यांसोबत करार करतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही काळ तो थिएटर्समध्ये दाखवल्यानंतर तो एका विशिष्ट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जातो. यामुळे निर्मात्यांना तो प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या प्रेक्षकांचा युझरबेस मिळतो तर करारामधून ओटीटी प्लॅटफॉर्मसला चांगला कंटेंट मिळत असल्याने अधिक दर्शक आकर्षित करण्याची संधी मिळते. अनेकदा हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स समोरुन निर्मात्यांशी संपर्क करुन तुमचा चित्रपट आमच्या माध्यमातून दाखवा अशी ऑफर देतात. अनेकदा हे प्लॅटफॉर्म्स पैसे मोजून हे चित्रपट प्रसारित करण्याचे हक्क विकत घेतात. कमाईचा पैसा ते या ठिकाणी गुंतवतात. अधिक चांगले चित्रपट म्हणजे अधिक प्रेक्षक आकर्षित होणार असं हे गणित असतं.

संपूर्ण चित्रपट विकत घेणे
अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स संपूर्ण चित्रपटच निर्मात्यांकडून विकत घेतात. करोना कालावधीमध्ये तर अनेक चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित झालेले. उदाहरण सांगायचं झालं तर सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ठरलेला दिल बेचारा हा डिस्ने प्लस हॉटस्टारने विकत घेऊन थेट ओटीटीवरुन प्रदर्शित केलेला.

स्वत: कंटेंट निर्माण करणे
अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स , डिस्ने हॉटस्टारसारखे प्लॅटफॉर्म्स स्वत: चित्रपट निर्मितीमध्ये गुंतवणूक करुन चित्रपट बनवतात. अनेकदा असे चित्रपट नेटफ्लिक्स स्पेशन, प्राइम ओरिजनल अशा मथळ्याखाली दिसतात. या चित्रपटा निर्मितीमध्ये त्यांना वेगवगेळ्या माध्यमांमधून पैसे मिळतात.

कोणकोणते ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत
अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
नेटफ्लिक्स
डिस्ने प्लस हॉटस्टार
व्हूट
झी फाइव्ह
एलव्हासीए टीव्ही
जीओ टीव्ही
होई चोई
बिग फ्लिक्स
एचव्हाय फ्लिक्स
सोनी लाइव्ह
एमएक्स प्लेअर
अल्ट बालाजी
अ‍ॅरॉस नाऊ
आरे
सन एनएक्सटी
शिमारु
एअरटेल एक्सस्ट्रीम
अड्डा टाइम्स
युआयव्ही
व्होडाफोन प्ले
टीव्हीएफ प्ले
एमयूबीआय