scorecardresearch

विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?

Maharashtra Chitra Rath 2023: १९९३ ते ९५ अशी सलग तीन वर्षे आपलाच चित्ररथ त्यात पारितोषिकांवर नाव कोरत राहिला. हा विक्रम कुठल्याही राज्याला आजतागायत मोडता आला नाही. यंदा चौथ्यांदा विजयी होण्यासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असणार आहे बघुयात..

विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?
विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्र्राची यंदाची थीम नेमकी काय असणार? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Republic Day 2023 Parade: प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ याचे दर्शन होणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. या देवींच्या भव्य-दिव्य सुंदर प्रतिमांच्या माध्यमातून स्त्री शक्तीचे दर्शन घडवणारा यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ असणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते पण तत्पूर्वी आपण चित्ररथामध्ये महाराष्ट्राची कामगिरी आजवर कशी ठरली आहे यावर एक नजर टाकुयात..

महाराष्ट्राचा चित्ररथ कोण बनवतं?

चित्ररथांची लांबी ४५ फूट, उंची १६फूट आणि रुंदी १४ फूट अशी मर्यादित केलेली असते. चित्ररथ बांधणीसाठी मिलिटरी कॅन्टोन्मेंटमधील जंगलात सर्व बाजूंनी लोखंडी पत्रे लावून संरक्षण मंत्रालयातर्फे मोठा कॅम्प उभारला जातो. अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था पुरविली जाते. कॅम्पमध्ये चित्ररथ बांधणीचे काम करण्यासाठी एक स्वतंत्र सपाट जागा उपलब्ध करून दिली जाते. बांधणीचे काम करणाऱ्या व्यक्तींकरिता, चित्ररथाशी निगडित सादरीकरण करणाऱ्या महिला आणि पुरुष कलाकारांकरिता स्वतंत्रपणे सुविधा पुरवल्या जातात. याठिकाणी डॉक्टरांसहित सर्व प्रकारची वैद्यकीय सुविधा पुरविली जाते.

हे ही वाचा<< भाजी विक्रेते, रिक्षाचालक ते.. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडला ‘या’ VVIP पाहुण्यांना असेल हक्काचं स्थान

कर्तव्य पथावर चित्ररथ डौलात निघणार तेव्हा..

दरवर्षी २३ जानेवारीला संचलनाची रंगीत तालीम होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रमुख पाहुणे इत्यादींच्या पेहरावातील कलाकार त्यात परफॉर्म करतात. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मूळ विषयाला अनुरूप संगीत, नाटय़ आणि नृत्याचे सादरीकरण ठरते. प्रत्येक चित्ररथाला ५८ ते ६२ सेकंद ही वेळ मर्यादा आखून दिलेली असते.

हे ही वाचा<< १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमध्ये फरक काय? तिरंगा फडकावण्याचा मान, नियम व जागा कशा बदलतात जाणून घ्या

आजवर महाराष्ट्राचा चित्ररथ किती वेळा जिंकला आहे?

१९५० पासून हे संचलन सुरू आहे, पण १९९३ ते ९५ अशी सलग तीन वर्षे आपलाच चित्ररथ त्यात पारितोषिकांवर नाव कोरत राहिला. हा विक्रम कुठल्याही राज्याला आजतागायत मोडता आला नाही. महाराष्ट्राच्या योगदानावरचा पहिला चित्ररथ १९८६ साली राजपथावर प्रदर्शित झाला. २०१८ सालापर्यंत माझी एकूण वीसएक डिझाइन्स निवडली गेली. त्यापैकी सहा चित्ररथांना पारितोषिके मिळाली. १९९३, १९९४ आणि १९९५ ही सलग तीन वर्ष अनुक्रमे ‘गणेशोत्सव’, ‘हापूस आंबा’ आणि ‘बापू’ या चित्ररथांवर महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांकाची मोहर उमटवून हॅट्रिक केली.

दरम्यान, २०१४ साली महाराष्ट्राच्या चित्ररथात नारळी पौर्णिमेचे दर्शन देशाला घडले, २०१५ साली पंढरीची वारी सर्वश्रेष्ठ ठरली, तर २०१८ साली शिवराज्याभिषेकाच्या विषयाला प्रथम पारितोषिक मिळाले. २०२२ साली कास पठाराच्या विषयाद्वारे राज्याच्या जैवविविधतेचा चित्ररथ पुरस्कारप्राप्त ठरला नसला, तरी त्याचे कौतुक झाले होते.

हे ही वाचा<< विश्लेषण: गूगल १२ हजार जणांना नोकरीवरून काढणार; कर्मचाऱ्यांना किती भरपाई देणार?

प्रजासत्ताक दिनाला यंदा खास पाहुणे

२६ जानेवारी २०२३ ची परेड खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचं प्रतीक ठरावी यासाठी खास पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. हे VVIP म्हणजेच आपल्या देशातील श्रमजीवी असणार आहेत. भाजी विक्रेते, रिक्षा चालक तसेच ज्या कामगारांनी सेंट्रल व्हिस्टा तयार करण्याचे काम केले अशा मंडळींची कुटुंब, कर्तव्य पथचे देखभाल करणारे कामगार यांना यंदा मुख्य व्यासपीठावर मानाचं व हक्काचं स्थान मिळणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 18:37 IST

संबंधित बातम्या