शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व घेऊन काही मुले जन्माला येत असतात. तर काहींना जन्मानंतर अपंगत्व येते. मानसिक अपंगत्वही वेगवेगळ्या प्रकारचे असते. स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी, शिक्षण घेण्यात अडचणी आदी अशा मानसिक आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांना सर्व प्रकारची मदत देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही संस्था प्रयत्नशील असतात. त्या मुलांना, तसेच त्यांच्या पालकांना समुपदेशनाची, मदतीची, मार्गदर्शनाची गरज असते. त्या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्या मानसिक, भावनिक, शैक्षणिक, वर्तणूकविषयक विकासासाठी या संस्था मार्गदर्शन करतात.  अशाच संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही माहिती-

न्यू होरायझन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर, मुंबई. हेल्पलाइन क्रमांक – ७५०६१७१२४०.

Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
pune metro station marathi news, pune metro marathi news
पुणे: स्थानकांच्या नावातून मेट्रो मालामाल! वर्षाला कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या महामेट्रोचा फंडा

ला कासा स्कूल फॉर ऑटिझम अँड स्पेशल नीडस्, बेलापूर, नवी मुंबई. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ ६५२१०६०९, ९००४६०४३३०.

स्नेहालय स्पेशल स्कूल, मीरा रोड, मुंबई. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २८१०१६८२, ९८९२११२७०७, ९८९२७६८४७२. ही संस्था आर्थिकदृष्टय़ा कमकुवत वर्गातील शारीरिक व मानसिकदृष्टय़ा अपंग असणाऱ्या मुलांसाठी कार्य करते.

हेल्प हँडिकॅप्ड इंटरनॅशनल, गिरगाव, मुंबई.  क्रमांक – ०२२ २३८९८९३०, ०२२  २३८२१९०१.

मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या काही संस्थांची नावे आणि त्यांचे हेल्पलाइन क्रमांक –

सवेरा स्पेशल स्कूल, मुंबई – ०२२ २२०७३७२७.

श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन, मुंबई – ०२२ २८९१८३२१, ०२२ २२८९५४३३.

स्पॅस्टिक सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई – ०२२ २६४३०७०३, ०२२ २६४३०७०४.

समराटिन्स, मुंबई – ०२२ २३०९२०६८, ०२२ २३०७३४५१.

वल्लभदास दाग्रा इंडियन सोसायटी फॉर मेंटली रिटार्डेड, मुंबई – ०२२ २८८९२४०९, ०२२ २८८८७३८०.

शारीरिकदृष्टय़ा अपंग असणाऱ्या व्यक्तींना आपल्या अपंगत्वाचा दाखला ठिकठिकाणी सादर करावा लागतो. केंद्र सरकारच्या कुटुंबकल्याण मंत्रालयाने स्थापन केलेल्या ‘ऑल इंडिया इंन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन’ या संस्थेतर्फे अपंग व्यक्तीच्या अपंगत्वाचे मूल्यांकन करून हा दाखला दिला जातो. त्यासाठी – ०२२ २३५४४३४१, ०२२ २३५४४३३२, २३५१५७६५, २३५४५३५८.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com