11 July 2020

News Flash

IPL 2018 – चेपॉकच्या मैदानाला २ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचं कडं, चेन्नईत आयपीएल सामन्यांना विरोध वाढला

कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपावरुन वाद सुरु आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (संग्रहीत छायाचित्र)

कावेरी पाणीवाटपावरुन चेन्नईत आयपीएल सामन्यांना होणारा विरोध पाहता, चेन्नई सुपर किंग्ज प्रशासन आणि पोलिसांनी आज होणाऱ्या सामन्यासाठी कंबर कसली आहे. दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगुन आल्यानंतर चेन्नईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. मात्र काही राजकीय पक्षांनी आयपीएलचे सामने खेळवले गेल्यास रस्त्यावर उतरुन निषेध करु असा इशारा दिला आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २ हजार पोलीस कर्मचारी चेपॉकच्या मैदानावर होणाऱ्या सामन्याला शुभेच्छा देणार आहेत. शीघ्र कृती दलाची ४ पथकं, ३ पोलीस उपायुक्त, ७ अतिरीक्त पोलीस उपायुक्त, २९ सहायक पोलीस आयुक्त आणि १०० पोलीस निरीक्षक असा मोठा फौजफाटा चेन्नईला तैनात करण्यात आला आहे.

अवश्य वाचा – कावेरी पाणीवाटप वाद पेटला असताना चेन्नईत IPL सामने होणे लज्जास्पद- रजनीकांत

ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आपले सामने खेळेल. राज्य सरकारने आम्हाला सर्वतोपरीने सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीसांना संघ प्रशासन संपूर्ण मदत करणार असल्याचं, चेन्नईच्या संघाचे विशेष कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

अवश्य वाचा – नवीन हंगामात चेन्नईतून आयपीएलचे सामने हद्दपार? राजकीय पक्षांचा सामने खेळवण्यास विरोध

कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये सुरु असलेल्या कावेरी नदीच्या पाणीवाटपावरुन सध्या, तामिळनाडूतलं राजकारण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कर्नाटकला पाण्याचा जास्त वाटा देण्यात आल्याने तामिळनाडूच्या जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावर स्वतंत्र लवाद बसवण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत पाणीवाटपाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत चेन्नईत आयपीएलचे सामने खेळवले जाऊ नयेत अशी भूमिका तामिळनाडूतल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली आहे. नुकतचं राजकारणात आलेल्या रजनीकांत आणि कमल हसन यांनीही आयपीएल सामन्यांना आपला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे चेन्नई विरुद्ध कोलकाता हा आजचा सामना कसा रंगतो हे पाहणं महत्वाचं ठरलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 2:42 pm

Web Title: ipl 2018 force of 2000 personnel deployed for the csk vs kkr match at the chepauk
टॅग Csk,IPL 2018
Next Stories
1 IPL 2018 – दुखापतग्रस्त केदार जाधवऐवजी इंग्लंडच्या डेव्हि़ड विलीला चेन्नईच्या संघात जागा
2 IPL 2018 – मुंबई इंडियन्सच्या अडचणींमध्ये वाढ, महत्वाचा गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर
3 चेपॉकवर विजयासाठी चेन्नई उत्सुक
Just Now!
X