समीर गायकवाडच्या ‘ब्रेन मॅिपग’ची मागणी फेटाळली

कॉ. गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची ब्रेन मॅिपग चाचणी करण्याची पोलिसांची मागणी शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावली.

शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असून ते शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे.

कॉ. गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची ब्रेन मॅिपग चाचणी करण्याची पोलिसांची मागणी शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावली. तत्पूर्वी गायकवाड याने आपली मानसिक स्थिती बरी नसल्याने ब्रेन मॅिपग चाचणी देणार नसल्याचे न्यायालयास सांगितले होते. दरम्यान, गायकवाड याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये २३ ऑक्टोबपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

पानसरे खून प्रकरणी सांगली येथील समीर गायकवाड याला पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर तो अकरा दिवस पोलीस कोठडीत होता. त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. ती मुदत शुक्रवारी संपली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Court refused brain mapping of sameer gaikwad

ताज्या बातम्या