कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचे शेकडो समर्थक शुक्रवारी रात्री मुंबईला रवाना झाले. उद्या सकाळी ते मातोश्रीवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मिणचेकर यांना उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी करणार आहेत. यामुळे या मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराची स्पर्धा आणखी वाढीस लागली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेनेकडे गेला आहे. शिवसेनेने राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असली तरी शेट्टी यांनी तो बाहेरून मिळावा अशी अट ठेवली आहे. यामुळे घोडे अडले आहे. दुसरीकडे शिवसेनेची मशाल हाती घेण्यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे तसेच मराठा क्रांती संघटनेचे नेते सुरेश दादा पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहे. तर, शिवसेनेने पक्षाचा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या अंतर्गत पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर व हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा – उमेदवारीसाठी वसंत मोरेंची वणवण

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिणचेकर यांच्या रूपाने मागासवर्गीय सक्षम उमेदवार देऊन सोशल इंजिनिअरिंग घडवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मतदारसंघात मागासवर्गीय उमेदवार देऊन वेगळी समीकरणे मांडण्याच्या हालचाली सुरू आहेत. या अंतर्गत मिणचेकर यांना हातनंगलेतून प्रतिसाद वाढत आहे. यासाठीच आज रात्री डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक वाहनांचा ताफा घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या ते उद्धव ठाकरे यांना भेटून मिणचेकर यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर उद्या कोणता निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.