कोल्हापूर : महिन्याभरापूर्वी एस.टी.सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याच्यासह या टोळीतील सातजणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तरीही बिनधास्तपणे संजय तेलनाडे इचलकरंजीत फिरत असल्याने हद्दपार आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कोल्हापुरात आरोपीस २० वर्षांची शिक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस.टी. सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे याच्यासह या टोळीतील सात जणांना पोलिसांनी महिन्याभरापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलं आहे. तरीही संजय तेलनाडे यानं काँग्रेस कमिटीतील कार्यक्रमाला हजेरी लावत राजकीय भाषण केलं. तो महापालिकेतही बराच काळ वावरत होता. तेलनाडे काँग्रेस कमिटीत आल्याचं समजताच पोलिसांनी धाव घेतली मात्र तो निघून गेला होता. सोशल मिडीयावरील रिल्स, फोटोमधून तेलनाडे हा काँग्रेस कमिटीतील कार्यक्रमास हजर असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी याबाबत पुढील कारवाई करण्याचे पत्र शिवाजीनगर पोलीस ठाण्याला दिले होते. अखेर हद्दपार आदेशाचं पालन न केल्याप्रकरणी शनिवारी रात्री त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.