कोल्हापूर : संततधार पावसामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या मोसमातील दुसरा दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. गुरुपौर्णिमेच्या पूर्व संध्येलाच हा सोहळा झाल्याने शेकडो भाविकांनी येथे पवित्र स्नानाचा लाभ घेतला.

हेही वाचा – कोल्हापूर : अलमट्टीतून दोन लाख क्यूसेक विसर्ग करून महापुरावर नियंत्रण आणण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हेही वाचा – अवघा कोल्हापूर जिल्हा चिंब; जिल्हाधिकाऱ्यांच्या सतर्क राहण्याच्या सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या २४ तासात कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत सुमारे सहा फूट वाढ झाली आहे. कृष्णाचे पुराचे पाणी दत्त मंदिराच्या उत्तर द्वारातून श्रींच्या मुख्य चरण कमलावरून दक्षिण दारातून बाहेर पडले. या दक्षिण द्वार सोहळ्याला अनेक भाविकांनी हजेरी लावून पवित्र स्नानाचा लाभ घेतला. उद्या रविवारी गुरुपौर्णिमा साजरी होत असल्याने व दक्षिण द्वार झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने शेकडो भाविकांनी येथे पवित्र स्नानाचा लाभ घेतला. दत्त देव संस्थांमार्फत रोप ब्रॅकेटची व्यवस्था केल्याने भाविकांना सुलभपणे स्नान करता आले. दुपारी अडीचनंतर पाण्याची पातळी वाढत गेली.