scorecardresearch

Premium

कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरासाठी शेतकरी संघाची वास्तू अधिग्रहितचे आदेश; मोगलाई लागली आहे का?संघाचा विरोध

महालक्ष्मी मंदिरा लगत असलेल्या शेतकरी संघाची इमारतीचा भूमिगत मजला, तळमजला व पहिला मजला ही जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने लागू केले आहेत.

shetkari bajar kolhapur
कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरासाठी शेतकरी संघाची वास्तू अधिग्रहितचे आदेश; मोगलाई लागली आहे का?संघाचा विरोध

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरा लगत असलेल्या शेतकरी संघाची इमारतीचा भूमिगत मजला, तळमजला व पहिला मजला ही जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने लागू केले आहेत. मात्र या निर्णयाला शेतकरी संघाने विरोध केला असून अशा मोगलाई पद्धतीने जागा ताब्यात घेता येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शनिवारी नोंदवली आहे. यामुळे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिरात नवरात्र ते नाताळ सुट्टी या कालावधीत भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. अशावेळी अनुचित घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने परिसर मोकळा असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी सहकारी संघाची उपरोक्त जागा अधिग्रहित करण्याची नोटीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावर यांनी लागू केली आहे.

mumbai high court, district collector of kolhapur, building of farmers cooperative union, mumbai high court slams district collector of kolhapur
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिराशेजारील वास्तू अधिग्रहण; शेतकरी संघाची जीत, जिल्हा प्रशासनाची हार
shree kopineshwar temple thane, thane district collector, thane municipal commissioner
ठाण्याच्या ऐतिहासिक कौपीनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार की दुरुस्ती? महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केली मंदिराची पाहणी
Siddhivinayak temple Savdad
बुलढाण्यातील सवडदवासीयांनी नरकाचा केला स्वर्ग! जेथे होते घाणीचे साम्राज्य अन् दारूचा अड्डा तेथे उभारले सिद्धीविनायक मंदिर
Nirmalya vehicle Wardha
वर्धा : निर्माल्याचे पावित्र्य जपावे म्हणून स्वतंत्र निर्माल्य वाहन, शिवमंदिर भगिनी मंडळाचा पुढाकार

हेही वाचा >>>महाराष्ट्र जनता दलाला देवेगौडा यांची भूमिका, भाजपाशी युती अमान्य

तर न्यायालयात आव्हान

दरम्यान, उपरोक्त वास्तूला कुलूप लावून त्याच्या चाव्या तातडीने जिल्हा प्रशासनाकडे द्यावेत, असे आदेश आले असल्याचे शेतकरी संघाचे अशासकीय प्रशासकीय अधिकारी मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी सांगितले. शेतकरी संघाचे ४५ हजार सभासद असताना त्यांचा मालकी हक्क डावलून कोणतीही पूर्व सूचना न देता जागा अधिकृत करणे बेकायदेशीर आहे. मुळात या जागेबाबत शेतकरी संघ आणि भाडे तत्त्वावर दिलेल्या मॅग्नेट कंपनीचा उच्च न्यायालयात वाद सुरू असून न्यायालयाने या जागा, वास्तू बाबत जैसे थेचे आदेश दिले आहेत. तरीही प्रशासन अशा पद्धतीने जागा अधिग्रहित करणार असेल तर त्यास न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा >>>शेतकऱ्याने पंजा मारण्याआधीच शासनाकडून ऊस निर्यात बंदी अध्यादेश मागे – राजू शेट्टी

संघाचा गैरसमज

दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी संघाची हि जागा नवरात्र काळासाठी गर्दी नियंत्रण साठी घेतली जाणार आहे. यापूर्वीही शेतकरी संघाची हि विना वापर असलेली जागा पूर्वीही नवरात्र काळात नियंत्रण कक्षासाठी वापरली जात होती. शेतकरी संघ कायमचा ताब्यात घेण्याचा कोणताही विचार नाही, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Order to acquire vastu of farmer sangh for mahalakshmi temple in kolhapur amy

First published on: 23-09-2023 at 19:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×