07 July 2020

News Flash

कसोटी संघात पुनरागमन करण्याचे ध्येय -भुवनेश्वर

३० वर्षीय भुवनेश्वर जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा सामना खेळला आहे.

भुवनेश्वर कुमार

करोनानंतरच्या काळात क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर भारताच्या कसोटी संघात पुन्हा स्थान मिळवण्याचे माझे मुख्य लक्ष्य आहे, अशी प्रतिक्रिया वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केली.

३० वर्षीय भुवनेश्वर जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा सामना खेळला आहे. ‘‘सध्याचे चित्र पाहता किमान ऑगस्ट महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होण्याची शक्यता कमी आहे. परंतु सर्व काही सुरळीत झाल्यानंतर स्वत:ला पुन्हा सिद्ध करून भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याचे माझे ध्येय आहे. माझ्या तंदुरुस्तीवरही मी गेल्या काही महिन्यांपासून अफाट मेहनत घेतली आहे. त्यामुळे मैदानावर पुन्हा एकदा माझ्या गोलंदाजीची कमाल दाखवण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे भुवनेश्वर म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 2:02 am

Web Title: aim to return to the test team bhubaneswar abn 97
Next Stories
1 प्रीमियर लीगच्या मुख्य लढती त्रयस्थ ठिकाणी?
2 विजयी घोडदौड राखण्यासाठी बायर्न म्युनिक उत्सुक
3 भारत आणखी २५-३० वर्षे बुद्धिबळातील महासत्ता!
Just Now!
X