20 September 2020

News Flash

Video : काही कळायच्या आतच फिंचची दांडी गुल, ख्रिस वोक्सचा भन्नाट चेंडू पाहिलात का??

दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलिया पराभूत, फिंचची एकाकी झुंज

पहिला वन-डे सामना जिंकून मालिकेची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याच सामन्यात निराशा केली आहे. इंग्लंडला २३१ धावांवर रोखल्यानंतर चांगली सुरुवात केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि यजमान इंग्लंडने २४ धावांनी सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. विजयासाठी २३२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांच्या भेदक माऱ्यासमोर २०७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

अवश्य वाचा – कांगारुंची हाराकिरी, इंग्लंडविरुद्ध हातातला सामना गमावला

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला स्टॉयनिस झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार फिंच आणि लाबुशेन यांनी भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. फिंचने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. लाबुशेनसोबत भागीदारीदरम्यान फिंचने आपलं अर्धशतकही साजरं केलं. ७३ धावांवर खेळत असताना ख्रिस वोक्सचा टप्पा पडून आत आलेला चेंडू फिंचला समजलाच नाही आणि काही कळायच्या आतच त्याची दांडी गुल झाली. पाहा हा व्हिडीओ…

फिंच माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाची घसरगुंडी उडाली. मधल्या फळीत कॅरीचा अपवाद वगळता एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज तग धरु शकला नाही. जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2020 3:25 pm

Web Title: chris woakes cleans up aaron finch with a peach of a delivery in 2nd odi between england and australia psd 91
Next Stories
1 कांगारुंची हाराकिरी, इंग्लंडविरुद्ध हातातला सामना गमावला
2 यूएस ओपन २०२० : ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमची अलेक्झांडर झेवरेव्हवर मात
3 विरोध झुगारुन लावत इराणने कुस्तीपटूला फासावर लटकवले
Just Now!
X