इंडोनेशियाचे तौफिक हिदायत हे माझ्यासाठी लहानपणापासून आदर्श खेळाडू आहेत आणि त्यांच्याबरोबर आयबीएल स्पर्धेत खेळण्याचे भाग्य मला लाभणार असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने सांगितले.
आगामी आयबीएल स्पर्धेत सायना व तौफिक हे हैदराबाद हॉटशॉट्स संघाकडून खेळणार आहेत. सायना म्हणाली, या खेळात माझ्यापुढे तौफिक यांचा आदर्श आहे. त्यांच्यासारखा आक्रमक खेळ करण्याचा माझा प्रयत्न असतो. आता त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मला मिळणार आहे. त्याचा फायदा मला भावी कारकिर्दीसाठी मिळणार आहे. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकावयास मिळणार आहे.
तौफिक हे मनगटाच्या साहाय्याने चपलख हालचाली करीत खेळ करण्याबाबत ख्यातनाम आहेत. त्यांचा खेळ प्रेक्षकांना खेळाचा आनंद देणारा ठरणार आहे. त्यांचे परतीचे फटके प्रतिस्पर्धी खेळाडूला चकविणारे असतात. अचूकता व नियंत्रण ही त्यांची शैली अतुलनीय आहे. २००९ मध्ये लखनौ येथे मी त्यांच्याबरोबर मिश्र दुहेरीच्या प्रदर्शनीय सामन्यात भाग घेतला होता. त्यावेळी तौफिक, प्रकाश पदुकोन व पुल्लेला गोपीचंद यांच्या समवेत मी छायाचित्र काढून घेतले होते असेही सायनाने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2013 रोजी प्रकाशित
तौफिक हिदायतबरोबर खेळण्याचा आनंद वेगळाच- सायना
इंडोनेशियाचे तौफिक हिदायत हे माझ्यासाठी लहानपणापासून आदर्श खेळाडू आहेत आणि त्यांच्याबरोबर आयबीएल स्पर्धेत खेळण्याचे भाग्य मला लाभणार असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे,
First published on: 30-07-2013 at 05:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delighted to be in same team as taufiq hidayat saina nehwal