News Flash

ENG VS NZ: डेव्हन कॉनवेने षटकार खेचत झळकावले दुहेरी शतक, रचला इतिहास

लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने इंग्लंडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले.

डेव्हन कॉनवेने षटकार खेचत झळकावले दुहेरी शतक (photo twitter)

लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने इंग्लंडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले. डावखूऱ्या सलामीच्या फलंदाजाने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. कॉनवेने मार्क वुडला षटकार मारत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. कॉनवेने ३४७ चेंडूत दुहेरी शतक पुर्ण केले. तो इंग्लंडमध्ये पदार्पण करताना दुहेरी शतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटू आहे.

कॉनवेने ३४७ चेंडूत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. कॉनवेने त्याच्या दुहेरी शतकात २२ चौकार आणि एक षटकार लगावला. मात्र, पुढच्याच षटकात कॉनवे धावबाद झाला आणि न्यूझीलंडचा पहिला डावदेखील संपला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३७८ धावा केल्या. कॉनवेने २००, हेनरी निकल्सने ६१ आणि नील वॅग्नरने नाबाद २५ धावा केल्या.

हेही वाचा – आज असा क्रिकेटपटू कसोटी पदार्पण करतोय, ज्याने घर-गाडीसकट सर्वकाही विकलंच, पण देशही सोडला!

डेव्हन कॉनवे कसोटी क्रिकेट इतिहासातील एकमेव फलंदाज आहे ज्याने पदार्पणाच्या पहिल्या डावात एका षटकारासह डबल शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या आणखी दोन खेळाडूंनी षटकार मारून दुहेरी शतके पूर्ण केली आहेत.

डेव्हन कॉनवेने रचला इतिहास

मॅथ्यू सिन्क्लेअर आणि माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम यांनी हे पराक्रम केले आहेत. पहिल्या कसोटीतील सर्वात मोठा डाव खेळण्याच्या दृष्टीने कॉनवे सहाव्या क्रमांकावर आहे. टिप फॉस्टरने १९०३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८७ धावा केल्या. जॅक रुडोल्फने २००३ मध्ये बांगलादेशविरूद्ध नाबाद २२२ धावा केल्या. लॉरेन्स रो आणि मॅथ्यू सिन्क्लेअर यांनी २१४-२१४ धावांचा डाव खेळला. ब्रँडन कुरुप्पूने १९८७ मध्ये २०१ धावा केल्या.

२००३ साली इंग्लंडमध्ये परदेशी फलंदाजाने डबल शतक झळकावले होते. हा पराक्रम ग्रीम स्मिथने केला होता, आता डेव्हन कॉनवेने १८ वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 10:10 am

Web Title: devon conway hit a double century with a six srk 94
Next Stories
1 ‘२०१४’ आणि आताचा ‘विराट कोहली’ यांच्यात फरक, रवी शास्त्री म्हणाले…
2 ‘जडेजा सारखा खेळाडू  इंग्लंडला मिळाला तर…’ पीटरसन म्हणाला…
3 सागर धनखड हत्या प्रकरण : साक्षीदारांचे रक्षण करण्यासाठी सरकारने पावले उचलावी!
Just Now!
X