18 November 2017

News Flash

धोनी आणि कोहलीत रंगला फुटबॉलचा सामना

वन-डे मालिकेत भारतीय संघाचा कस लागण्याची शक्यता नाहीच

लोकसत्ता टीम | Updated: August 19, 2017 7:58 PM

टीम इंडिया ( संग्रहीत छायाचित्र )

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रविवारी वन-डे मालिकेला सुरुवात होत आहे. उद्या दम्बुल्लाच्या मैदानात दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. या सामन्याआधी सरावादरम्यान टीम इंडियाने दम्बुल्लाच्या मैदानावर फुटबॉलचा सामना खेळला. या सामन्यादरम्यान कोहली आणि धोनी हे संघाचे दोन आजी-माजी कर्णधार समोरासमोर आले. यावेळी उप-कर्णधार रोहीत शर्मा, फिरकीपटू यजुवेंद्र चहल, के.एल.राहुल, केदार जाधव यांनीही या सामन्यात सहभाग घेतला.

बीसीसीआयने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर या सामन्याचा फोटो शेअर केला आहे.

कसोटी मालिकेत श्रीलंकेला ३-० अशी मात दिल्यानंतर कोहीलीची टीम इंडिया वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झालेली आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून यापुढचे सर्व सामने हे भारतासाठी महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे या श्रीलंकेविरुद्ध भारत कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.

असा असेल भारताला वन-डे संघ –

विराट कोहली ( कर्णधार ), शिखर धवन, रोहीत शर्मा ( उप-कर्णधार ), लोकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी ( यष्टीरक्षक ), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर

अवश्य वाचा – Video: लंकेची खैर नाही, पहिल्या वन-डेसाठी धोनीचा कसून सराव

 

First Published on August 19, 2017 7:58 pm

Web Title: india tour of sri lanka 2017 team india practice football in dambulla ground ahead of first odi against sri lanka
टॅग Ms Dhoni,Virat Kohli