News Flash

RCB मध्ये आले दिल्लीचे दोन अष्टपैलू खेळाडू, एकहाती जिंकून देऊ शकतात सामना

विराट कोहलीच्या आरसीबीनं दिल्लीच्या दोन अष्टपैलू खेळाडूंना संघात घेतलं आहे.

IPL 2021: आयपीएलच्या १४ व्या हंगमापूर्वी विराट कोहलीच्या आरसीबीनं दिल्लीच्या दोन अष्टपैलू खेळाडूंना संघात घेतलं आहे. दुबई येथे झालेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात दिल्लीकडून खेळणाऱ्या हर्षल पटेल आणि डॅनिअल सॅम्स यंदाच्या हंगामात आरसीबीकडून खेळताना दिसतील. शुक्रवारी दिल्लीनं या दोन्ही खेळाडूंना आरसीबीसोबत ट्रेड केलं आहे.

आयपीएल २०२१ च्या लिलावापूर्वी ४ फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विंडो सुरु राहणार आहे. यामध्ये दोन संघ अपापसांत चर्चा करुन खेळाडूंची देवाणघेवाण अथा विकत घेऊ शकतात. आरसीबीनं दिल्लीकडून शुक्रवारी हर्षल पटेल आणि डॅनिअल सॅम्स यांना घेतलं आहे. दिल्ली आणि आरसीबीनं आपल्या अधिकृत ट्विटवरुन याची माहिती दिली आहे.

हर्षल पटेल आणि डॅनियल सॅम्स आरसीबीसाठी तुरुफ का इक्का ठरु शकतात. कारण, आरसीबीनं २०२१ पूर्वी अनेक अष्टपैलू खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. यामध्ये ख्रिस मॉरिस आणि मोईन अलीसारख्या खेळाडूचा समावेश आहे.

हर्षल पटेलने आयपीएलमध्ये खेळलेल्या ४८ सामन्यात ४६ विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय तळाला चांगली फलंदाजीही करु शकतो. ऑस्ट्रेलियाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज डॅनिअल सॅम्सही फटकेबाजी करण्यात पटाईत आहे. सॅम्सने ५१ टी-२० सामन्यात ६३ बळी घेतले आहे. डॅनिअल सॅम्सनं बिग बॅश लीगमध्ये दोन अर्धशतकंही झळकावली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 8:04 am

Web Title: ipl 2021 harshal patel daniel sams transferred to royal challengers bangalore from delhi capitals nck 90
टॅग : IPL 2021
Next Stories
1 IPL 2021 : राजस्थानचा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज आता चेन्नईच्या संघात
Just Now!
X