‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळख बनवलेल्या इशान किशनने आपल्या फलंदाजीच्या जोरावर सर्वांची मने जिंकली आहेत. यंदा इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत इशानने ३२ चेंडूत ५६ धावांची खेळी करत सर्वांना स्तब्ध केले. त्याची कामगिरी आणि फलंदाजीचे तंत्र पाहून माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने त्याच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. इशानच्या फलंदाजीसमोर विराटची फलंदाजी थंड होती, असे आकाशने सांगितले.

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून भारतीय संघातील फलंदाजी आणि आयपीएलमुळे घडलेला विकास या गोष्टींवर प्रकाश टाकला. आकाश म्हणाला, ”आयपीएल दरम्यान स्थानिक क्रिकेटपटूंना अटीतटीचे सामने खेळण्याची संधी मिळते, जे त्यांना परिपक्व होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आयपीएलने प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना पूर्ण स्टेडियममध्ये खेळण्याची परवानगी दिली. माझी पहिली कसोटी ही प्रेक्षकांसमोर खेळलेला माझा पहिला सामना होता. इशान किशनने आयपीएलमध्ये चांगली भूमिका बजावली आणि जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा विराटची फलंदाजी त्याच्या फलंदाजीसमोर थंड पडली होती.”

आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा फक्त इशान किशनलाच नाही, तर अनेक भारतीय क्रिकेटपटूंना झाला असल्याचेही आकाशने सांगितले. तो म्हणाला, ‘नितीश राणाने पदार्पण केले नाही, परंतु त्याच्यावर कोणताही दबाव नाही. तो प्रेक्षकांसमोर सतत खेळत राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने स्कूप शॉटच्या मदतीने षटकार ठोकला.”

हेही वाचा – धर्माची भिंत तोडणारं नातं! टीम इंडियाच्या हिंदू क्रिकेटपटूनं मुस्लीम मुलीशी केलं लग्न

आयपीएलमुळे युवा भारतीय खेळाडूंना जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंसह आणि विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली असल्याचे आकाशने सांगितले. तो म्हणाला, ”आयपीएलने तुम्हाला बळ दिले आहे. बर्‍याच स्थानिक क्रिकेटपटूंना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आहे. दबाव आणि अपेक्षा कशा हाताळायच्या हे आपल्याला समजते. म्हणूनच मला वाटते की आयपीएल छान आहे. भारताकडून खेळण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे.”

यंदाचा आयपीएल हंगाम स्थगित

यंदाचा आयपीएल हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. ६० पैकी २९ सामने झाले आहेत. उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऑगस्टमध्ये बीसीसीआय दोन नवीन संघांसाठी निविदा काढू शकते. ऑक्टोबरपर्यंत दोन नवीन संघ समोर येतील. गोएंका ग्रुप आणि अदानी ग्रुप आयपीएल संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ फ्रेंचायझी यात पुढे आहेत. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर सामन्यांची संख्याही १५ ते ३० सामन्यांनी वाढेल.