मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीने पायाच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. राष्ट्रीय निवड समितीने त्याच्या जागी आर. विनय कुमारची भारतीय संघात निवड केली आहे. कोची येथे २१ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होईल. दुखापतीमुळे धवलची एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी पुन्हा हुकली आहे. २००९मध्ये न्यूझीलंड दौऱ्यासाठी धवलला भारतीय संघात स्थान मिळाले होते, पण एकही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 15, 2013 3:38 am