२०१९ च्या विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. संपूर्ण स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीचा हरवलेला फॉर्म आणि त्याची संथ फलंदाजी हा चर्चेचा विषय होता. यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. पंतला आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा उचलता आलेला नाही. गेलं वर्षभर महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. IPL मुळे तो क्रिकेटच्या मैदानावर परतणार होता, पण करोनामुळे सध्या ते लांबणीवर पडलं आहे. या दरम्यान माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने धोनीबद्दल एक माहिती दिली आहे.

लारा, कॅलीस, संगाकाराच्या पंगतीत विराटलाही स्थान

एका मुलाखतीत बोलताना कैफ म्हणाला, “मी धोनीसोबत खेळपट्टीवर धावायचो, ते दिवस मला अजूनही आठवतात. ज्या वेगाने आणि ऊर्जेने तो धाव घेण्यासाठी धावायचा, ती ऊर्जा अफाट होती. मला वाटतं की खेळपट्टीवर धाव घेणारा धोनीच सर्वात जलद खेळाडू असेल. जिममध्ये न जाता, बटर चिकन आणि बिर्याणीवर जोरदार ताव मारणारा आणि तरीही इतकी वेगवान धाव घेणारा धोनी पाहून मी तर थक्कच व्हायचो.”

“एकाच वेळी दोन सामने असल्यास विराटपेक्षा रोहितचा सामना बघेन”

“जर एकाच वेळी एकाच शहरात भारतीय संघ दोन सामने खेळणार असला, तर मी विराटच्या नेतृत्वाखालील सामना न पाहता रोहितच्या नेतृत्वाखालील सामना पाहण्याचा पसंती देईन. विराट हा एक उत्तम खेळाडू आहे आणि त्याची क्रिकेट कारकीर्द उल्लेखनीय आहे यात वादच नाही. पण रोहितची शैली वेगळी आहे. तो जेव्हा फटकेबाजी करतो तेव्हा सामना पाहायला अधिक मजा येते आणि महत्वाचे म्हणजे गोलंदाजाला कळतही नाही त्याच्यावर आता हल्ला चढवला जाणार आहे”, असं मोहम्मद कैफने स्पष्ट केले.