22 September 2020

News Flash

भारतीय संघाच्या पाठीशी राहा – धोनी

भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा बहुतांश वेळा लोकांमध्ये काही बोलताना दिसत नाही.

| September 1, 2015 03:17 am

भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा बहुतांश वेळा लोकांमध्ये काही बोलताना दिसत नाही. पण येथील एका कार्यक्रमात मात्र त्याने लोकांशी संवाद साधला आणि भारतीय कसोटी संघ संक्रमण अवस्थेत आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहा, असे धोनीने सांगितले. ‘‘आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज नेहमीच असते. यापुढेही भारतीय संघाच्या पाठीशी राहा. भारतीय संघ चांगला आहे. त्यामध्ये काही बदल होत आहेत, आम्ही नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, पण यामध्ये तुमचा पाठिंबाही आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,’’ असे धोनी म्हणाला. धोनी पत्नी साक्षीसह झारखंडचे माजी उपमुख्यमंत्री सुदेश कुमार माहतो यांच्याबरोबर येथे एका मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेला होता. या मंदिराचे काम सुरू असून पुढील वर्षी हे मंदिर साऱ्यांसाठी खुले होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2015 3:17 am

Web Title: stand with the indian team says ms dhoni
Next Stories
1 इंग्लिश प्रीमिअर लीग : युनायटेडचा विजयी रथ स्वानसीने रोखला
2 पुण्यात आंतरराष्ट्रीय नेमबाजांची मांदियाळी
3 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : मनोजचा उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश
Just Now!
X