विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर शुक्रवारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यानंतर अनुष्कानेही गावस्कर यांच्यावर टीका करत स्पष्टीकरण मागवले आहे. या टीके नंतर समाजमाध्यमांवर तीव्र टीका झाल्यावर वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव गावस्कर यांनी के ली.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात कोहलीने लोके श राहुलला दोनदा जीवदान दिले व फलंदाजीतही तो सपेशल अपयशी ठरला. त्यानंतर समालोचन कक्षात असलेल्या गावस्कर यांनी विराटसह त्याच्या पत्नीबद्दल वाईट शब्द उच्चारले. कोहलीच्या चाहत्यांना गावस्कर यांचे हे वक्तव्य आवडले नसून काहींनी त्यांची समालोचकांच्या यादीतून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली आहे.

‘‘टाळेबंदीच्या काळात विराट फक्त अनुष्काच्या गोलंदाजीवर फलंदाजी करत होता. टाळेबंदीमध्ये दोघेही आपल्या घरात क्रिकेट खेळताना दिसून आले आहेत,’’ असे विधान गावस्कर यांनी केले होते.

गुरुवारी झालेल्या सामन्यात कोहलीने पंजाबचा कर्णधार राहुलचे दोन झेल सोडले होते. १७व्या षटकांत राहुलला पहिले जीवदान मिळाले तेव्हा तो ८३ धावांवर खेळत होता. त्यानंतर ८९ धावांवर असताना १८व्या षटकात कोहलीने त्याचा दुसरा झेल सोडला होता. या जीवदानांचा पुरेपूर फायदा उठवत राहुलने ६९ चेंडूंत १३२ धावा केल्या. ‘आयपीएल’मध्ये भारतीय फलंदाजाची ही सर्वोत्तम खेळी ठरली. मग फलंदाजीस आलेल्या कोहलीला चमक दाखवता आली नाही. पाच चेंडूंचा सामना करत अवघी एक धाव काढून तो माघारी परतला.

त्रासदायक वक्तव्य -अनुष्का

गावस्कर तुम्ही के लेले वक्तव्य हे त्रासदायक असून पतीच्या कामगिरीबद्दल तुम्ही पत्नीला कसा दोष देऊ शकता? याचे स्पष्टीकरण मला मिळालेच पाहिजे. वर्षांनुवर्षे तुम्ही प्रत्येक क्रिकेटपटूच्या खासगी आयुष्याचा आदर करत आला आहात. त्यामुळेच तुम्ही आम्हाला समान वागणूक का दिली नाही, असा सवाल करत अनुष्काने गावस्कर यांच्यावर टीका के ली आहे. ‘‘तुमच्या मनात आमच्याविषयी अनेक शब्द, वाक्ये आली असतील. पण पतीच्या कामगिरीबद्दल वक्तव्य करताना तुम्ही पत्नीलाही मध्ये ओढले. या प्रक्रियेत पत्नीचे नाव घेणे योग्य आहे का? २०२० या वर्षांत माझ्यासाठी काही गोष्टी बदललेल्या नाहीत. त्यामुळे क्रिके टच्या वादात मला ओढणे कधी थांबेल? ‘सभ्य माणसांचा खेळ’ समजल्या जाणाऱ्या क्रिके टमध्ये तुमचे नाव आदराने घेतले जाते. त्यामुळे तुम्ही कोणत्या अर्थाने हे वक्तव्य के ले होते, ते मला समजू शके ल का,’’ असे स्पष्टीकरणही अनुष्काने मागवले आहे.

अनुष्काला दोषी ठरवले नाही – गावस्कर

कोहलीबाबतच्या वादावर गावस्कर यांनी शुक्रवारी आपली बाजू मांडली. ‘‘कोहलीच्या अपयशाबद्दल मी त्याची पत्नी अनुष्काला दोषी ठरवले नसून तिच्याबद्दल कोणतेही वाईट शब्द उच्चारले नाहीत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे,’’ असे स्पष्टीकरण गावस्कर यांनी दिले आहे. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही दौऱ्यादरम्यान खेळाडूंसोबत त्यांची पत्नी असावी, या मताचा मी आहे. टाळेबंदीदरम्यान खेळाडूंना योग्य सराव करता आलेला नाही, असा मुद्दा आकाश चोप्राने समालोचन करताना मांडला होता. पहिल्या सामन्यात खेळाडूंमध्ये शिथिलता आली होती. रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी हे फलंदाजी करताना चाचपडत होते, असे संदर्भ दिले जात असताना टाळेबंदीदरम्यान विराटने अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव के ला होता. तसा व्हिडीओ त्यांनी समाजमाध्यमांवर टाकला होता. यात मी अनुष्काला कसे दोषी ठरवले? किं वा तिच्याबद्दल कोणते वाईट शब्द उच्चारले?’’