सहावे पर्व संपल्यानंतर लवकरच आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत नव्या संघाला सामील करून घेण्याची प्रक्रिया सुरू  होईल, असे संकेत आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिले आहेत.
‘‘आयपीएलचा चालू हंगाम संपल्यानंतर दहाव्या संघाला सामील करण्यासंदर्भातील बोलणी करण्यात येईल,’’ असे शुक्ला यांनी सांगितले. याचप्रमाणे आयपीएलच्या सध्याच्या नियमांमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. चार परदेशी खेळाडूंनाच प्रत्येक संघात प्रत्यक्षात खेळता येईल, असे शुक्ला यावेळी म्हणाले. फुटबॉलनंतर इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा असल्याचे नमूद करतानाच १९८ देशांत आयपीएलचे थेट प्रक्षेपण पाहिले जाते, असे त्यांनी सांगितले.