09 July 2020

News Flash

IND vs BAN : सुरक्षाव्यवस्था भेदून विराटची भेट घेण्यासाठी चाहता थेट मैदानात

तिसऱ्या दिवशीच्या खेळात घडला प्रकार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंदूर कसोटी सामन्यात बांगलादेशवर डावाने विजय मिळवला. १ डाव आणि १३० धावांनी विजय मिळवत भारताने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या एका चाहत्याने त्याला भेटण्यासाठी मैदानावरील सुरक्षाव्यवस्थेचं कडं भेदून थेट मैदानात धाव घेतली.

अवश्य वाचा – IND vs BAN : इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय ! कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड

काही क्षणांमध्ये हा प्रसंग घडल्यामुळे सुरक्षारक्षकांनाही नेमकं काय करावं हे कळलं नाही. मात्र विराटने समजुतदारपणा दाखवत त्याला मैदानाबाहेर जाण्याची विनंती केली. यानंतर मैदानाचे सुरक्षा कर्माचारी आल्यानंतरही विराटने त्यांना चाहत्याला कोणतीही धक्काबुक्की न करता बाहेर नेण्याची विनंती केली. या चाहत्याने विराट कोहलीचं नाव आणि त्याच्या जर्सीचा नंबर आपल्या शरीरावर रंगवला होता.

 

या मालिकेतला दुसरा सामना २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : ऑस्ट्रेलियन दिग्गज कर्णधाराच्या कामगिरीशी विराटची बरोबरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2019 9:16 pm

Web Title: virat kohli fan breaks security to sneak into field during indore test psd 91
Next Stories
1 IND vs BAN : द्विशतकी खेळीत मयांकचा अनोखा विक्रम, रोहित-विराटच्या कामगिरीशी बरोबरी
2 तरुण वयात मी ज्या चुका केल्या त्या इतरांनी करु नये हीच माझी इच्छा !
3 IND vs BAN : ऑस्ट्रेलियन दिग्गज कर्णधाराच्या कामगिरीशी विराटची बरोबरी
Just Now!
X