27 February 2021

News Flash

….तर रोहित विश्वचषकात पाच शतकं करुच शकला नसता – रवी शास्त्री

रोहित-विराटमधील वादाचं वृत्त निराधार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. टी-२०, वन-डे आणि त्यानंतर कसोटी मालिकेत भारताने यजमान विंडीजला व्हाईटवॉश दिला. विंडीज दौऱ्याआधी कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्याती बेबनावाच्या वृत्तामुळे भारतीय संघाचं वातावरण ढवळून निघालं होतं. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. ते ‘Gulf News’ ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“गेली पाच वर्ष मी भारतीय संघासोबत आहे, ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडू खेळीमेळीने वागत असतात. रोहित-विराटमधील बेबनावाचं वृत्त मूर्खपणाचं आहे. विराट आणि रोहितला मी एकत्र खेळताना पाहत आलोय. जर दोघांमध्ये काही वाद असता तर रोहित विश्वचषकात पाच शतकं कसा झळकावू शकला असता?? विराट आता ज्या फॉर्मात आहे त्या फॉर्मात तो दिसलाच नसता, दोघांमध्ये मैदानात भागीदारी होऊ शकली नसती.” रवी शास्त्रींनी भारतीय खेळाडूंमध्ये असलेल्या वादाचं वृत्त फेटाळून लावलं.

भारतीय संघात प्रत्येक खेळाडूला आपलं मत मांडण्याची मूभा आहे. काहीवेळा अनेकांची मत वेगवेगळी असतात. प्रत्येकाने एकच विचार करावा अशी माझी अपेक्षा नसतेच, विविध विचारांमधून कधीकधी नवीन कल्पना सुचतात. त्यामुळे संपूर्ण विचारांती संघात योग्य खेळाडूला संधी दिली जाते, रवी शास्त्री टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणाबद्दल बोलत होते. विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. १५ सप्टेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून, दोन्ही संघध यात ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.

अवश्य वाचा – ‘हिटमॅन’ला भारतीय संघात मिळणार नवीन जबाबदारी, एम.एस.के. प्रसाद यांचे संकेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 3:28 pm

Web Title: why would rohit get five hundreds says ravi shastri on alleged virat kohli rohit sharma rift psd 91
Next Stories
1 “भारतानेच श्रीलंकन खेळाडूंना धमकावलं”; पाकच्या उलट्या बोंबा
2 Hockey Olympic Qualifiers : भारताचं ऑलिम्पिक तिकीट जवळपास निश्चीत, दुबळ्या रशियाचं आव्हान
3 समान कसोटी सामने जिंकूनही भारत अव्वल तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानी, कारण…
Just Now!
X