भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे मालिकेतील शेवटचा आणि तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. हा मालिकेतील निर्णायक सामना आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात पहिल्या एकदिवसीय सामन्याचा हिरो केएल राहुल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण सामन्याच्या मध्यभागी केएल राहुलच्याऐवजी इशान किशन यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात आला होता.

केएल राहुल अज्ञात कारणामुळे मैदानाबाहेर गेल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले होत. या दरम्यान त्याच्या जागी इशान किशन मैदानावर आला होता. त्याने काही काळ विकेटकीपिंग केली आहे. त्यानंतर पुन्हा केएल राहुल मैदानात परतला. तो सामन्यांच्या २९ व्या षटकांत मैदानात परतला आणि किशन पुन्हा मैदाना बाहेर गेला. दरम्यान राहुलच्या मैदानातून अचानक बाहेर पडल्याने ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नाचा पूर आला.

खरं तर, स्टार खेळाडू केएल राहुलला आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि वनडे वर्ल्ड कपसाठी भारताचा यष्टीरक्षक म्हणून पाहिले जात आहे. अशात अचानकपणे त्याने मैदान सोडल्याने अनेक चर्चेंना उधान आले होते. चाहत्यांनी ट्विटरवर त्याच्या अचानक न बाहेर पडण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – ICC ODI Rankings: विराट-रोहितला मागे टाकत ‘या’ युवा फलंदाजाने वनडे क्रमवारीत मारली बाजी; टॉप-५ मध्ये मिळवले स्थान

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी खेळण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघाने २९ षटकाच्या समाप्तीनंतर ५ बाद १४५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरी (१०) आणि मार्कस स्टॉयनिस (२) फलंदाजी करत आहे. ट्रेव्हि हेड ३३, मिचेल मार्श ४७ डेव्हिड वार्नर २३ धावा करुन बाद झाले आहेत. त्याचबरोबर कर्णधार स्मिथला भोपळाही फोडता आला नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अष्टपैलू खेळाडू आणि उपकर्णधार हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने भारतीय संघासाठी पहिल्या तीन विकेट घेतल्या. त्याचबरोबर कुलदीप यादवने २ विकेट घेतल्या.

नियम काय आहे?

बदली खेळाडू क्रिकेटमध्ये फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही. त्याला नेतृत्व करता येत नाही. MCC च्या कायद्यानुसार विकेटकीपिंग करू शकतो 24.1.2. मात्र यासाठी मैदानावरील पंचांची परवानगी घ्यावी लागतो. केवळ कन्कशन पर्यायाच्या प्रसंगी, प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरील खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कर्णधआर), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज