India vs Pakistan Match Live Streaming: आशिया चषक २०२५ स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना यूएईविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. युएईने भारतीय संघासमोर विजयासाठी ५८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी दिलेलं आव्हान ४.३ षटकात पूर्ण केलं आणि स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. आता भारताचा दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. दरम्यान हा सामना फुकटात कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये नेहमीच रोमांचक सामने पाहायला मिळत असतात. यावेळीही असाच काहीसा सामना पाहायला मिळू शकतो. हा सामना रविवारी १४ सप्टेंबरला रंगणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरुवात होईल.

या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी लिव ऍपवर केले जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. पण जर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन नसेल, तरीदेखील तुम्ही हा सामना पाहू शकता. हा सामना तुम्हाला डीडी स्पोर्ट्सवर फुकटात पाहता येणार आहे.

भारताचा यूएईवर दमदार विजय

भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना यूएईविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या यूएई संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ५७ धावांवर आटोपला. भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने ३०, शुबमन गिलने २० धावा करत संघाला ९ गडी राखून विजय मिळवून दिला.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

शुबमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव ( कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह,वरुण चक्रवर्ती.