French Open Final, Carlos Alcaraz vs Jannik Sinnner: जागतिक क्रमवारीतील नंबर १ टेनिसपटू यानिक सिनर आणि स्पेनचा खेळाडू कार्लोस अल्काराझ या दोघांमध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही युवा खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. शेवटी कार्लोस अल्काराझने बाजी मारत जेतेपदाचा मान पटकावला आहे. हा सामना सामन्यात अल्काराझने ४-६,६-७ (४-७), ६-४ (७-३), ७-६ (१०-२)अशा फरकाने जिंकला.
सिनर आणि अल्काराझ या दोन्ही खेळाडूंमध्ये तोडीस तोड लढत पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये दोघांमध्ये १२ मिनिटं लढत पाहायला मिळाली. या सेटमध्ये सिनरने बाजी मारली. सिनरने पहिला सेट ६–४ ने आपल्या नावावर केला. सिनरने पहिल्या दोन सेटमध्ये विजय मिळवून आघाडी घेतली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अल्काराझने दमदार कमबॅक केलं.
अल्काराझने हा सेट आपल्या नावावर केला. चौथ्या सेटमध्ये दोघांमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळाली. सिनरने या सेटमध्ये ५–४ ने आघाडी घेतली होती. हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेले ३ गुण त्याच्याकडे होते. मात्र, इथेच अल्काराझने आपल्या खेळाचा दर्जा दाखवला. लागोपाठ ३ मॅच पॉईंट वाचवून त्याने गेम आपल्या नावावर केला. टायब्रेकरमध्ये अल्काराझने बाजी मारली आणि निर्णय पाचव्या गेमपर्यंत पोहोचवला.
या सामन्यात सिनरला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. सिनर या लढतीत आघाडीवर होता. मात्र, अल्काराझनेही आपला खेळाचा दर्जा दाखवला आणि हातून निसटलेला अंतिम सामना आपल्या नावावर केला. सिनर आणि अल्काराझ दोघेही युवा खेळाडू आहेत. मात्र, या दोघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्याची इतिहासात नोंद झाली आहे. हा सामना फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ चाललेला सामना ठरला आहे. या सामन्याचा निकाल साडेपाच तासांनंतर लागला आहे. मात्र,शेवटपर्यंत दोघांमध्ये जेतेपदासाठी कडवी झुंज सुरू होती. २१ व्या शतकात फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद राखणारा अल्काराझ हा तिसराच पुरूष टेनिसपटू ठरला आहे.
कार्लोस अल्काराझने सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यात लॉरेन्जो मुसेटीला ३–१ ने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात मुसेटीला रिटायर्ड व्हावं लागलं होतं. हा सामना देखील शेवटच्या सेटपर्यंत गेला होता. तर दुसरीकडे सिनरने स्टार खेळाडू नोवाक जोकोविचला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हा सामना त्याने ६–४, ७–५, ७–६ (७–३) ने आपल्या नावावर केला.