CPL 2024 Imad Wasim and Kieron Pollard fight with the umpire : सीपीएल २०२४ मध्ये पाकिस्तानी फलंदाजाने धुमाकूळ घातला आहे. सामन्यादरम्यान आऊट दिल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू इमाद वसीमचा अंपायरशी बराच वेळ वाद झाला. त्यामुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला. सामन्यादरम्यान झालेल्या या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अँटिग्वा अँड बारबुडा फाल्कन्सचा खेळाडू इमाद वसीम आणि त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार अंपायरशी वाद घालताना दिसत आहेत.

कॅरेबियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्स आणि अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स यांच्यात सामना खेळला जात होता. या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १३४ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सने हा सामना ६ गडी राखून जिंकला. तथापि, अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स संघ एकेकाळी संघर्ष करत होता. यावेळी पाकिस्तानी फलंदाज इमाद वसीम संघाच्या वतीने फलंदाजी करत होता. दरम्यान, त्रिनबागो नाइट रायडर्सचा गोलंदाज सुनील नरेनने इमाद वसीमविरुद्ध एलबीडब्ल्यूची अपील केली.

का झाला वाद?

अंपायरने ही अपील फेटाळून लावत इमाद वसीमला नाबाद घोषित केले. यानंतर त्रिनबागो नाईट रायडर्सने अंपायरच्या निर्णयाविरुद्ध डीआरएस घेतला. त्यानंतर टीव्ही अंपायरने इमाद वसीमला आऊट दिले. थर्ड अंपायरच्या या निर्णयावर पाकिस्तानी फलंदाज इमाद वसीम नाराज दिसला आणि मैदानी अंपायरकडे गेला आणि त्यांना रिप्ले नीट पुन्हा एकदा पाहण्यास सांगितले. कारण इमादचे म्हणणे होते की, चेंडू त्याच्या बॅटला लागल्यानंतरच त्याच्या पॅडला लागला होता.

हेही वाचा – IND vs BAN : मोहम्मद सिराज संतापल्याने ऋषभ पंतला मागावी लागली माफी, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंपायरने निर्णय बदलल्याने वसीम-पोलार्ड संतापले –

यानंतर अंपायरने आधी इमाद वसीमला समजवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांनी पुन्हा रिप्ले पाहिला. ज्यामध्ये तो नॉट आऊट असल्याचे दिसले. त्यामुळे थर्ड अंपायरने मैदानावरील अंपायरला आपला निर्णय बदलण्यास सांगितले. हा निर्णय बदलला गेल्याने इमाद ड्रेसिंग रूममधून पुन्हा फलंदाजीसाठी आला. त्यावेळी त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा कर्णधाार किरॉन पोलार्ड, इमाद वसीम आणि अंपायर यांच्यात जोरदार वाद झाला. या घटनेमुळे खेळ ५ मिनिटे थांवण्यात आला होता. त्यानंतर इमाद वसीमला नॉट आऊट घोषित करण्यात आले, ज्यामुळे इमाद वसीमने २७ चेंडूत ३६ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळी साकारली.