FICA: Shocking! Money or country, FICA's report created a sensation in the cricket world | Loksatta

FICA: धक्कादायक! पैसा की देश, फिकाच्या रिपोर्टने क्रिकेटविश्वात उडवली खळबळ

फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (फिका) च्या अहवालातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली. पैसा की देश यावर सर्व देशांच्या क्रिकेट मंडळानी विचार करणे आवश्यक आहे.

FICA: धक्कादायक! पैसा की देश, फिकाच्या रिपोर्टने क्रिकेटविश्वात उडवली खळबळ
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियातील टी२० विश्वचषकात मोठ्या संघांना पराभवाचा सामना करावा लागला त्यात प्रामुख्याने न्यूझीलंड, भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे भारतीय संघावर चोहीबाजूंनी टीका देखील झाली. त्यातील काही टीका या परदेशातील टी२० लीग खेळण्यासाठी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना परवानगी द्यावी अशी मागणी देखील केली. त्याचवेळी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (FICA) च्या अहवालातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार, बहुतेक खेळाडूंना त्यांच्या स्वतःच्या देशाव्यतिरिक्त इतर टी२० ल लीगमध्ये खेळायचे आहे. ज्यामुळे त्यांना आर्थिकरित्या सक्षम होता येईल.

टी२० लीगचे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व आहे. जवळपास सर्वच कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये टी२० लीगचे आयोजन केले जात आहे. जगातील अनेक खेळाडूंनी यासाठी आपल्या देशाचा केंद्रीय करार नाकारला. फिका, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स असोसिएशन फेडरेशनने जारी केलेल्या नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की जगातील ४९ टक्के खेळाडू आगामी काळात केंद्रीय करार नाकारू शकतात. त्याऐवजी तो फ्रीलान्स होऊन वेगवेगळ्या लीगमध्ये खेळेल.

फिका ने या सर्वेक्षणात भारतीय खेळाडूंचा समावेश केलेला नाही, कारण ते फिका च्या कक्षेत येत नाहीत. अहवालानुसार, “४९ टक्के खेळाडूंना डोमेस्टिक लीगमध्ये खेळून जास्त पैसे मिळाल्यास ते सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नाकारण्याचा विचार करू शकतात.” याशिवाय, एकदिवसीय क्रिकेट हळूहळू संपेल अशी आणखी एक चर्चा आहे. खेळाडूही ५० षटकांच्या एकदिवसीय सामन्यांना पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व देत नाहीत.

हेही वाचा :   IND vs NZ 3rd ODI: “सूर्यकुमार चेज मास्टर बनू शकत नाही कारण…”, खराब प्रदर्शनानंतर चाहते भडकले

फिकाच्या अहवालानुसार, “जगातील ५४ टक्के खेळाडूंना वाटते की ५० षटकांचा विश्वचषक हा अजूनही आयसीसीचा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तथापि, मागील अहवालाच्या तुलनेत यात घट झाली आहे. २०१८-१९ मध्ये, ८६ टक्के खेळाडूंना वाटले की एकदिवसीय विश्वचषक सर्वोत्कृष्ट वाटला. आयसीसी क्रमवारीत पहिल्या नऊमधील संघांनी गेल्या वर्षी सरासरी ८१.५ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. क्रमवारीत १० ते २० मधील असलेल्या संघांनी सरासरी २१.५ दिवस क्रिकेट खेळले आहे. २०२१ मध्ये ४८५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले. २०२० मध्ये कोविड-१९ महामारी दरम्यान झालेल्या २९० सामन्यांपेक्षा हे १९५ अधिक आहे. हा आकडा २०१९ (५२२ सामने) पेक्षा खूपच कमी आहे.

एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, फिका या क्रिकेटपटूंच्या संघटनेने आपला एक अहवाल सादर केला. यामध्ये जगभरातील बहुतांशी क्रिकेटपटूंचा कल हा विविध टी२० लीग खेळण्याकडे असल्याचे दिसून येत आहे. सध्या जगातील तब्बल ४० टक्के खेळाडू टी२० लीग खेळण्यासाठी आपल्या राष्ट्रीय संघासह करारात नाहीत. तर, ४२ टक्के खेळाडू कमीत कमी एक लीग खेळत असतात. फिकाने ११ देशांच्या ४०० पेक्षा जास्त खेळाडूंचा हा सर्वे केला होता. यामध्ये भारत व पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश नाही.

हेही वाचा :   IND vs NZ 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदरचे झुंजार अर्धशतक! न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताने केल्या केवळ २१९ धावा

खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, मोहम्मद रिझवान हा खेळाडू होता ज्याने गेल्या वर्षी सर्वाधिक दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. तो ८० दिवस सामना खेळला. भारतीय संघात ऋषभ पंत अव्वल स्थानावर आहे. त्याने ७५ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 13:11 IST
Next Story
IND vs NZ 3rd ODI: श्रेयस अय्यरने रचले अनेक विक्रम; ३४ वर्षांनंतर केला ‘हा’ नकोसा पराक्रम, घ्या जाणून