बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेटलिफ्टर जेरेमी लालरिन्नुगाने ६७ किलो वजनी गटात एकूण ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय जेरेमीचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हे पहिलेच वर्ष आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेरेमीने एक वेटलिफ्टर म्हणून नाही तर बॉक्सर म्हणून सुरुवात केली होती.

१९ वर्षीय जेरेमीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करताना शानदार कामगिरी केली आहे. त्याने २०१८मधील युवा ऑलिंपिक स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. सध्या यशस्वी वेटलिफ्टिर असलेल्या जेरेमीला खेळाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्याचे वडील लालनेलुआंगा हे ९० च्या दशकाच्या सुरुवातीला आयझॉलच्या बॉक्सिंग सर्किटमध्ये प्रसिद्ध होते.

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
Rasikh Salam Dar was reprimanded for breaching the IPL code of conduct
DC vs GT : रसिख सलाम दारला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने वेगवान गोलंदाजाला फटकारले
IPL 2024 rishabh pant apologized camera person whom he hit by his six in dc vs gt match watch
ऋषभ पंतचा षटकार अन् कॅमेरामन जखमी; दिल्लीच्या कॅप्टनने केलेल्या VIDEO तील ‘त्या’ कृतीने जिंकले नेटिझन्सचे मन
Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”

हेही वाचा – Commonwealth Games 2022 : जेरेमी लालरिन्नुगाने पेलला ‘सुवर्णभार’; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण

एका बेवसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेरेमीने आपल्या वडिलांबद्दल माहिती दिली होती. तो म्हणाला होता, “माझ्या वडिलांसोबत एक बॉक्सर म्हणून माझा प्रवास सुरू झाला. माझे वडील त्यांच्या तरुणपणी मिझोराममधील आयझॉल बॉक्सिंग सर्किटमधील एक ओळखीचा चेहरा होते. त्यांने राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती. परंतु, कुटुंबातील आर्थिक समस्यांमुळे त्यांना खेळ सोडून नोकरी करावी लागली. मी लहानपणापासूनच त्यांच्याकडे बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले आहे.”

बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असताना जेरेमी घराजवळील व्यायामशाळेत मुलांना वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेताना बघत असे. त्यांना बघून त्याने या खेळात येण्याचा निर्णय घेतला. गावातच सुरू झालेल्या एका अदादमीमध्ये त्याने टलिफ्टिंगचे शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ओल्या बांबूच्या मोळ्या उचलून त्याने प्रशिक्षणाला सुरुवात केली होती. आठ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला पुणे येथील सैन्य क्रीडा संस्थेत प्रवेश मिळाला होता.

जेरेमीचा धाकटा भाऊदेखील क्रीडा क्षेत्रामध्ये. अशा प्रकारे जेरेमी एका क्रीडाप्रेमींच्या कुटुंबातील सदस्य आहे. बॉक्सिंगपासून सुरुवात करून त्याने वेटलिफ्टिंगमध्ये देशाचा गौरव वाढवला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून त्याने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.