David Warner asking who said I’m Finished : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. त्याने स्पर्धेदरम्यान कठीण परिस्थितीत संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्यामुळे कांगारू संघाला सहाव्यांदा ऐतिहासिक कामगिरी करता आली. स्पर्धेदरम्यान तो ३७ वर्षांचा आहे, असे कधीच वाटले नाही. तो २७ वर्षांच्या तरुणासारखा मैदानात धावताना दिसला. आता या अष्टपैलू खेळाडूने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट खूप चर्चित आहे.

स्पर्धेपूर्वी जे लोक त्याच्या वयाबद्दल बोलत होते, त्यांना त्याने सामन्यादरम्यान त्याच्या बॅटने उत्तर दिले. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत तो कांगारू संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. एवढेच नाही तर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सहाव्या स्थानावर राहिला.वास्तविक, वर्ल्ड कप २०२३ मध्ये वॉर्नरने ४८.६३ च्या सरासरीने एकूण ५३५ धावा केल्या. तो ऑस्ट्रेलियन संघातील आघाडीचा फलंदाज म्हणून उदयास आला.

आता एकदिवसीय विश्वचषक संपला असून, त्याने एका पोस्टद्वारे आपल्या क्रिकेट कारकिर्दीचे अपडेट दिले आहेत. ही पोस्ट पाहिल्यानंतर क्रिकेटप्रेमी खूश होतील. वास्तविक, ईएसपीएनक्रिकइन्फोने विश्वचषक संपल्यानंतर त्याची खास कामगिरी शेअर केली होती. यादरम्यान कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वॉर्नरच्या विश्वचषकातील कारकिर्दीचा शेवट मोठ्या विक्रमासह झाला.’

हेही वाचा – World Cup 2023: भारताच्या पराभवाचा आनंद बांगलादेमध्ये साजरा? सोशल मीडियावर VIDEO शेअर करून केला जातोय दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने ईएसपीएनक्रिकइन्फोच्या या पोस्टवर आपले उत्तर दिले आहे. त्याने लिहिले आहे, ‘कोण म्हणाले की माझे काम संपले आहे?’ वयाच्या दृष्टीने पाहिले तर वॉर्नरने कदाचित शेवटचा वनडे विश्वचषक सामना खेळला असेल. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याने आपल्या बॅटने ५६.५५ च्या सरासरीने १५२७ धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १०१.१४चा राहिला आहे. विश्वचषकात वॉर्नरच्या नावावर सहा शतके आणि पाच अर्धशतके आहेत.