Harbhajan Singh Statement on Border Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. दोन्ही संघ तयारीत व्यस्त आहेत, तर माजी क्रिकेटपटूंनी आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीबाबत अनेक भाकीत केले आहेत. पर्थमध्ये विजयाची नोंद करून संघाला दमदार सुरुवात करावी लागेल, ज्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल आणि या कठीण दौऱ्यात त्यांना पुढे जाण्यास मदत होईल, असा विश्वास माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने व्यक्त केला.

नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता. यावर हरभजन सिंग म्हणाला की, मालिका गमावल्यामुळे संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे, पण ऑस्ट्रेलियातील परिस्थिती घरच्या परिस्थितीपेक्षा वेगळी असल्याने भारतीय फलंदाजांची त्याला फारशी चिंता नाही. तो पुढे म्हणाला की, टीम इंडिया ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरण्याची शक्तता ५०-५० टक्के आहे.

हरभजन सिंग काय म्हणाला?

u

जतिन सप्रूच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हरभजन सिंग म्हणाला, ” टीम इंडिया पुन्हा एकदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची शक्यता ५०-५० टक्के आहे. मी भारताने अलीकडे खेळलेल्या क्रिकेटचा विचार करत नाही, कारण इथली परिस्थितीत वेगळी होती. चांगल्या फलंदाजाकडे पाहून देखील असे वाटत होते की त्यांना फलंदाजी कशी करावी हे माहित नाही.”

हेही वाचा – KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला

मालिका गमावल्यामुळे भारताचा आत्मविश्वास डळमळीत –

हरभजन म्हणाला की, मालिका गमावल्यामुळे संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे, पण ऑस्ट्रेलियातील परिस्थिती घरच्या परिस्थितीपेक्षा वेगळी असल्याने भारतीय फलंदाजांची त्याला फारशी चिंता नाही. माजी फिरकीपटूने सांगितले की, भारताची ट्रॉफी राखण्याची शक्यता ५०-५० टक्के आहे. जतिन सप्रूच्या यूट्यूब चॅनलवर हरभजन सिंग म्हणाला, “मी भारताने अलीकडे खेळलेल्या क्रिकेटचा मी विचार करत नाही कारण परिस्थिती वेगळी होती. चांगल्या फलंदाजाकडे पाहून असे दिसते की त्याला फलंदाजी कशी करावी हे माहित नाही. वरिष्ठ खेळाडूंनी रणजी करंडक खेळावा, असे लोक म्हणत होते. याने काही फरक पडणार नाही. कारण ऑस्ट्रेलियात चांगली परिस्थिती असेल. खेळपट्ट्या चांगल्या असतील.”

हेही वाचा – Sourav Ganguly : ‘तो जे बोलला ते योग्यच…’, गौतम गंभीरने रिकी पॉन्टिंगला दिलेल्या प्रत्युत्तरावर सौरव गांगुलीचे वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाला मायदेशात खेळण्याचा फायदा होईल -|

हरभजन सिंग पुढे म्हणाला, “मला वाटते की फलंदाज चांगली कामगिरी करतील. आपल्याला पुजारा सारख्या खेळाडूची गरज आहे, जो खेळपट्टीवर टिकू शकेल आणि चेंडूला जुना करेल. मागील मालिकेतील अपयशामुळे केएल राहुलवर खूप टीका झाली आहे, पण तो चांगला खेळाडू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका जिंकण्याची संधी ५०-५० टक्के असेल, पण मी म्हणेन की ऑस्ट्रेलिया संघ थोडा पुढे आहे. कारण ते घरच्या मैदानावर खेळत आहेत आणि सध्या भारताचा आत्मविश्वास थोडा डळमळीत झालेला आहे. पण पहिली कसोटी खूप महत्त्वाची असेल. जर भारताने पर्थमध्ये चांगली सुरुवात केली, तर संघ मालिकेत चुरशीची लढत देईल. जर भारताची सुरुवात चांगली झाली नाही, तर भारतासाठी अडचणी वाढतील. “