KL Rahul returns to nets after injury scare : भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून (शुक्रवार) पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली आहे.

केएल राहुलने पुन्हा नेटमध्ये सराव सुरु केला –

पर्थ कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार फलंदाज केएल राहुलने पुन्हा एकदा नेटमध्ये फलंदाजीला सुरुवात केली आहे. भारत अ विरुद्धच्या सराव सामन्यात राहुलला प्रसिध कृष्णाचा चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. वेगवान चेंडू राहुलच्या उजव्या हाताच्या कोपराला लागला होता. यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. मात्र, राहुल आता या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल देणार सलामी –

पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल यशस्वी जयस्वालसह डावाची सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे. रोहितसाठी पर्थ कसोटीत खेळणे कठीण आहे. रोहित दुसऱ्यांदा वडील झाला असून त्याला काही दिवस कुटुंबासोबत राहायचे आहे. रोहित ॲडलेड कसोटीसाठी संघात सामील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शुबमन गिल पर्थ कसोटीत खेळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

हेही वाचा – Sourav Ganguly : ‘तो जे बोलला ते योग्यच…’, गौतम गंभीरने रिकी पॉन्टिंगला दिलेल्या प्रत्युत्तरावर सौरव गांगुलीचे वक्तव्य

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सराव सामन्यात दुसऱ्या स्लिपमध्ये झेल घेताना शुबमन गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर लगेच स्कॅनसाठी मैदान सोडले. बीसीसीआयच्या एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की, गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे आणि कसोटी सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे तो तंदुरुस्त होणे जवळजवळ अशक्य आहे. वेळेत अंगठ्याचे फ्रॅक्चर बरे होण्यासाठी साधारणत: १४ दिवस लागतात.