टी२० विश्वचषकात पुन्हा एकदा चाहत्यांना क्रिकेटचा पुरेपूर आनंद घेता येणार आहे. एकीकडे चाहत्यांना जिथे क्रिकेटपटूंचा शानदार खेळ पाहायला मिळणार आहे, तिथेच सामन्यादरम्यान त्यांना माजी क्रिकेटपटू आणि नामवंत समालोचकांकडून सामन्याची अवस्था बघायला आणि ऐकायला मिळणार आहे. आयसीसीने टी२० विश्वचषकात सहभागी समालोचकांची यादी जाहीर केली आहे.

समालोचकांची या यादीमध्ये भारताच्या हर्षा भोगले, रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांचा समावेश आहे. याशिवाय नुकतेच निवृत्त झालेले इयॉन मॉर्गन, प्रेस्टन मॉमसेन, डेल स्टेन आणि नियाल ओब्रायन यांसारखे माजी क्रिकेटपटूही सामन्यादरम्यान समालोचन करताना दिसतील. टी२० विश्वचषक स्पर्धेत १६ संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी नामांकित २९ समालोचकांच्या गटात मेल जोन्स, इसा गुहा आणि नताली जर्मनोस महिला समालोचक म्हणून उपस्थित आहेत.

समालोचन पॅनेल

एडम गिलक्रिस्ट, अतहर अली खान, बाजिद खान, ब्रायन मुर्गट्रोयड, कार्लोस ब्रैथवेट, डेल स्टेन, डैनी मॉरिसन, डिर्क नानेस, इयोन मॉर्गन, हर्षा भोगले, इयान बिशप, इयान स्मिथ, ईसा गुहा, मार्क हॉवर्ड, मेल जोन्स, माइकल एथरटन, माइकल क्लार्क, नासिर हुसैन, नताली जर्मनोस, नियाल ओ’ब्रायन, पोम्मी मबांगवा, प्रेस्टन मोमसेन, रवि शास्त्री, रसेल अर्नोल्ड, सैमुअल बद्री, शेन वॉटसन, शॉन पोलक, साइमन डोल, सुनील गावस्कर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी२० विश्वचषक स्पर्धेत फेरी-१ मध्ये आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. मग याद्वारे, चार संघ सुपर १२ मध्ये प्रवेश करतील, त्यानंतर खऱ्या साहसाला सुरुवात होईल. दोन्ही सुपर-१२ गटातील सर्वोतम दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.