भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांपेक्षा पावसाने जास्त वेळ बॅटिंग केली. पावसामुळे ४ वेळा सामना थांबला. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सेट होण्याची संधी मिळाली नाही. मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय संघाला मालिकेत टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकण अतिशय महत्वाचं असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.
भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो
या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पदार्पण केलं होतं. पण या दोघांनाही पदार्पणाच्या सामन्यात आपली छाप सोडता आलेली नाही. विराट, रोहित, गिल आणि श्रेयस सारखे प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले. ७ महिन्यांनंतर पुनरागमन करत असलेला रोहित अवघ्या ८ धावा करू शकला. तर रोहितला खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे मालिका जिंकायची असेल तर भारतीय फलंदाजांना दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
मालिकेतील दुसरा सामना हा ॲडीलेडच्या मैदानावर रंगणार आहे. या खेळपट्टीवर फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळते. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. पहिल्या सामन्यात असा एकही फिरकी गोलंदाज नव्हता की, जो गरज असताना विकेट्स काढून देईल. दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. वेगवान गोलंदाज हर्षित राणाला या सामन्यासाठी संधी दिली गेली होती. पण त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. मात्र त्याला आणखी संधी दिली जाऊ शकते. पण जर कुलदीप यादवला संधी दिली गेली, तर वॉशिंग्टन सुंदरची प्लेइंग ११ मधून सुट्टी होऊ शकते. आता शुबमन गिल दुसऱ्या वनडे सामन्यासाठी काय बदल करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११:
रोहित शर्मा, शुबमन गिल ( कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.