scorecardresearch

Premium

IND vs AUS: टीम इंडियाच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवचे मोठे विधान; म्हणाला, “हा वेडेपणा होता…”

IND vs AUS 3rd T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला शेवटच्या चेंडूवर पराभवाला सामोरे जावे लागले. ग्लेन मॅक्सवेलने शानदार शतक झळकावले. यावर कर्णधार सूर्यकुमार यादवने सूचक वक्तव्य केले.

It was madness team India surrendered even after scoring 222 runs Suryakumar Yadav made such excuses
सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यातील पराभवाची वेगवेगळी कारणे सांगितली. सौजन्य- (ट्वीटर)

India vs Australia 3rd T20: ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४७ चेंडूत नाबाद शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मॅक्सवेल ट्रॅविस हेडसह फलंदाजीला आला आणि त्याने धावांचा पाठलाग करताना संघाला चांगली सुरुवात करून दिली. एका बाजूला विकेट्स पडत राहिल्या, पण दुसऱ्या बाजूने मॅक्सवेल झंझावाती खेळ करत राहिला. अखेरच्या षटकांमध्ये त्याने कर्णधार मॅथ्यू वेडच्या साथीने शानदार विजय मिळवला.

सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यातील पराभवाची वेगवेगळी कारणे सांगितली. ग्लेन मॅक्सवेलच्या फलंदाजीवर तो म्हणाला, “मॅक्सीला लवकरात लवकर बाद करण्याची आमची योजना होती. २२० धावा या मैदानावर खूप होत्या. रात्री मोठ्या प्रमाणात दव पडले मात्र, असे जरी असले तरी ही धावसंख्या गोलंदाजांना टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी खूप होती. ऑस्ट्रेलिया नेहमीच शेवटच्या चेंडूपर्यंत हार मनात नाही. गोलंदाजांना मी सांगितले की, त्याला (मॅक्सवेल) लवकर बाद करण्याचा प्रयत्न करा पण तसे झाले नाही. मॅक्सवेलला बाद करण्याकडे अधिक लक्ष्य देण्याच्या नादात आम्ही धावा रोखण्यात अपयशी ठरलो, हा वेडेपणा होता.”

ICC action on Wanindu Hasranga
SL vs AFG 3rd T20 : पंचांशी वाद घालणं पडलं महागात; श्रीलंकेच्या कर्णधारावर आयसीसीची मोठी कारवाई
India Vs England 3rd Test Rohit Sharma Video Viral
IND vs ENG : रोहित शर्माने बूट उचलला, अन् जैस्वाल-सर्फराझसह इंग्लंडचे खेळाडू फिरले माघारी, VIDEO व्हायरल
Rohit Sharma taunts Jadeja Video Viral
IND vs ENG : नो बॉलवरून रोहित शर्माचा जडेजाला टोमणा, लाईव्ह सामन्यात म्हणाला “अरे यार आयपीएलमध्ये तर…”
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?

अक्षर पटेलला १९वे षटक देण्याबाबत सूर्या म्हणाला, “अक्षर हा अनुभवी गोलंदाज आहे. मैदानावर दव जास्त असल्याने मी अनुभवी गोलंदाजाला गोलंदाजी करायला सांगितली, मग तो फिरकीपटू असला तरीही. मला माझ्या खेळाडूंचा खूप अभिमान आहे.” गेल्या महिन्यात क्रिकेट विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावणारा मॅक्सवेल जेव्हा २२ चेंडूत ४२ धावांवर होता, तेव्हा स्टॉयनिस बाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला सात षटकात ९५ धावांची गरज होती. रवी बिश्नोईने पुढच्याच षटकात टीम डेव्हिडला याच टी-२० मालिकेत दुसऱ्यांदा बाद करून ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक धक्का दिला, पण मॅक्सवेलने हार न मानता अर्शदीप सिंगच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले.

हेही वाचा: IND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेलच्या शतकी खेळीपुढे भारतीय गोलंदाज भुईसपाट, पाच गडी राखून ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय

ऑस्ट्रेलियाला पाच षटकांत ७८ धावा हव्या होत्या आणि डावाच्या १८व्या षटकात प्रसिध कृष्णाने सहा धावा दिल्याने तो हा सामना टीम इंडियाकडे झुकला होता. शेवटच्या दोन षटकांत ४३ धावा हव्या असताना ऑस्ट्रेलियाचे समीकरण कठीण झाले होते. मॅथ्यू वेडने अक्षर पटेलच्या १९व्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार खेचून मॅक्सवेलवरील दडपण कमी केले, पण तरीही ऑस्ट्रेलियन संघाला शेवटच्या षटकात २१ धावांची गरज होती. मॅक्सवेल स्ट्राईकवर येण्यापूर्वी २०व्या षटकाची सुरुवात वेडने चौकाराने केली.

हेही वाचा: Team India: रोहित-विराट टी-२० मध्ये पुनरागमन करणार? पुढील आठवड्यात आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची होणार घोषणा

अष्टपैलू मॅक्सवेलने प्रसिधच्या चेंडूवर षटकार मारला आणि त्यानंतर चौकारांची हॅट्ट्रिक साधत ऑस्ट्रेलियाला शानदार विजय मिळवून दिला आणि आपले शतकही पूर्ण केले. ४७ चेंडूत त्याने हे वादळी शतक ठोकले. मॅक्सवेलने पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ऑस्ट्रेलियनकडून सर्वात जलद शतक करत अ‍ॅरोन फिंच आणि जोश इंग्लिस (मालिकापूर्वी) यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मॅक्सवेलने या फॉरमॅटमधील चौथ्या शतकासह पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली. मालिकेत अजून दोन टी-२० सामने बाकी आहेत. पुढचा सामना रायपूरमध्ये १ डिसेंबरला होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus why did akshar patel bowl the 19th over against australia suryakumar yadav told the reason after the defeat avw

First published on: 29-11-2023 at 11:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×