मीरपूर कसोटी एका रोमांचक वळणावर आली असून भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीतील बदलाबाबत येथे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कसोटीच्या पहिल्या डावात उत्कृष्ट खेळी करणाऱ्या ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना निर्धारित फलंदाजी क्रमाने पाठवण्यात आले नाही, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट यांना फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. यावर भारताचे लिटिल मास्टर सुनील गावसकर संतापले. या कसोटीतही टीम इंडियाची अवस्था बिकट आहे. बांगलादेशने विजयासाठी भारतासमोर १४५ धावांचे लक्ष्य ठेवले, मात्र कालपर्यंत ४५ धावांत ४ गडी बाद अशी स्तिथी होती.

या सामन्यात खूप काही पाहायला मिळाले. टीम इंडिया दुसऱ्या डावात खूपच कठीण परिस्थितीत दिसत आहे. मात्र, तिसऱ्या दिवशी भारताने यजमानांना ३१४ धावांत गुंडाळले. मात्र त्यानंतर १४५ धावांचा पाठलाग करताना पाहुण्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्याचबरोबर फलंदाजीतही बदल दिसून आले. यानंतर भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी कर्णधार केएल राहुल आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा: IND vs BAN 2nd Test: विराट कोहलीने १ किंवा २ नाही, तर सोडले ४ झेल; व्हिडिओ होतोय व्हायरल

किंबहुना टीम इंडियाचा कर्णधार राहुलचा फ्लॉप शो कायम राहिला तर गिलही स्वस्तात चालत राहिला. त्यानंतर माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येण्याची अपेक्षा होती. मात्र अक्षर पटेल फलंदाजीला आला आणि हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एवढेच नाही तर विराट बाद झाल्यानंतर ऋषभ पंतचा नंबर होता पण जयदेव उनाडकट फलंदाजीला आला. भारताने आपले ४ फलंदाज ५० धावांच्या आत गमावले आहेत. अशा बदलानंतर सुनील गावसकर यांनी राहुल आणि द्रविडवर नाराजी व्यक्त केली आहे.

विराट हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे – सुनील गावसकर

तिसऱ्या दिवसानंतर गावसकर सोनी स्पोर्ट्सवर म्हणाले, “कोहलीच्या या अशा खेळीमुळे चांगला संदेश जात नाही. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. जोपर्यंत कोहलीने स्वत:हून संघाकडे मागणी केली नाही तोपर्यंत ती संघ व्यवस्थापन काय बघ्याची भूमिका घेणार का?. चेंजिंग रूममध्ये काय झाले ते आम्हाला माहित नाही. पण मागणी केली असेल तर की मान्य झाली नाही हे सांगणे खूप कठीण आहे.”

हेही वाचा: IND vs BAN 2nd Test: ‘विराटची आग अन तैजुलचा धूर!’ शाकीब आणि पंचानी मध्यस्थी केली नसती तर…, Video व्हायरल

दरम्यान, जडेजा म्हणाला, “तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. फक्त १५ षटके शिल्लक होती. लेफ्ट-राइट कॉम्बिनेशनसाठी हे केले असावे, असे सबा करीमने म्हटले होते. ही विचारसरणी ठीक आहे, पण मला वाटतं तेव्हा ऋषभ पंतने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या? गावसकर म्हणाले, “तो डाव्या हाताचा फलंदाज असो वा नसो, पण आता ऋषभ पंतला येऊ दिले पाहिजे. अक्षर पटेल जरी क्रीजवर असला तरी पंतला मैदानात येण्याची परवानगी द्यावी. आता डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा हा प्रयोग थांबायला हवा.”