Bangladesh's leading fast bowler Taskin Ahmed has been ruled out of the first ODI against India due to injury | Loksatta

X

IND vs BAN ODI: बांगलादेशला मोठा धक्का; तस्किन अहमद भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतून बाहेर

बांगलादेशचा प्रमुख वेगवान गोलंदाज तस्किन अहमद पाठीच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतून बाहेर पडला आहे.

IND vs BAN ODI: बांगलादेशला मोठा धक्का; तस्किन अहमद भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतून बाहेर
तस्किन अहमद पाठिच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतून बाहेर पडला आहे. (संग्रहित छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे (IND vs BAN). या मालिकेतील पहिला सामना ४ डिसेंबर रोजी शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे खेळवला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी यजमान बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. कारण संघाचा स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद दुखापतीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे.

विशेष म्हणजे, संघाचा स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद पाठदुखीमुळे पहिल्याच सामन्यातून बाहेर पडला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ता मिन्हाजुत अबेदिन यांनी क्रिकबझला ही माहिती दिली. बीसीबीचे मुख्य निवडकर्ता मिन्हाजुल आबेदीन यांनी गुरुवारी क्रिकबझला सांगितले की, “पाठदुखीमुळे तस्किनला वनडेच्या पहिल्या सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे. “त्याच्या सहभागाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही त्याची प्रगती पाहणार आहोत,” असेही ते म्हणाले.

एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ –

भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शारदा सुंदर ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

हेही वाचा – AUS vs WI 1st Test: स्टीव्ह स्मिथने दिग्गज डॉन ब्रॅडमनची केली बरोबरी, रोहित शर्मालाही दिले आव्हान

बांगलादेश एकदिवसीय संघ: नजमुल हुसेन शांतू, तमीम इक्बाल (कर्णधार), यासिर अली, आसिफ हुसेन, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन, शकीब अल हसन, अनामूल हक (यष्टीरक्षक), लिटन दास (यष्टीरक्षक), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), नुरुल हसन (यष्टीरक्षक), इबादत हुसेन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसीम अहमद, तस्किन अहमद.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:21 IST
Next Story
AUS vs WI 1st Test: स्टीव्ह स्मिथने दिग्गज डॉन ब्रॅडमनची केली बरोबरी, रोहित शर्मालाही दिले आव्हान