भारत आणि बांगलादेश संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी पार पडला. बांगलादेशने या अटीतटीच्या सामन्यात भारतावर १ विकेटने विजय मिळवला. मेहदी हसन मिराजच्या नाबाद ३१ धावांची खेळी सामन्यात निर्णायक ठरली. तसेच माजी कर्णधार शकिब अल हसनसमोर भारतीय क्रिकेट संघ असहाय्य दिसत होता. त्याने एकट्याने टीम इंडियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद करत शकीबने पाच विकेट्स घेतल्या. त्याने भारताविरुद्ध पाच विकेट्स घेताना,पाकिस्तानच्या माजी फिरकीपटूला मागे टाकले आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शकीबने शानदार गोलंदाजी केली. त्याने १० षटकात ३६ धावा देत एकूण ५ विकेट्स घेतल्या. त्याने टीम इंडियाच्या ५ महत्त्वाच्या विकेट्स आपल्या नावावर केल्या. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांना शाकिबने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले. हे पाचही खेळाडू टीम इंडियासाठी मोठी खेळी खेळण्यास सक्षम होते.

भारताविरुद्ध कसोटी आणि वनडेत सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेणारे गोलंदाज –

हेही वाचा – IND vs BAN 1st ODI: थरारक सामन्यात बांगलादेशचा भारतावर एक गडी राखून विजय; केएल राहुलचे अर्धशतक व्यर्थ

भारताविरुद्ध मीरपूर वनडेत ५ विकेट घेत शाकिबने स्पेशल क्लबमध्ये स्थान मिळवले. टीम इंडियाविरुद्ध कसोटी आणि वनडे अशा दोन्ही प्रकारात एका डावात ५ बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानचा सकलेन मुश्ताक, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, इंग्लंडचा ऍशले जाईल्स आणि श्रीलंकेचा अजंथा मेंडिस यांनी हा पराक्रम केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.