भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. भारतात खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (१० जानेवारी) गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातून भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू संघपुनरागमन करत आहेत. यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्मा भारतीय कर्णधाराच्या रुपात दिसणार आहे. त्याचबरोबर संघात विराट कोहली, केएल राहुल, मोहम्मद शमी हे खेळाडूही परतत आहेत. एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या आधी भारत ही मालिका खेळणार असून सुरूवात चांगली करण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे.

भारतातील क्रिकेटपटूंचे स्टारडम कोणापासून लपलेले नाही. खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते काय प्रयत्न करत नाहीत. असे काही चाहते आहेत जे आपल्या आवडत्या खेळाडूवर इतके प्रेम करतात की त्याला पाहून अश्रू अनावर होतात. असाच काहीसा प्रकार गुवाहाटीमध्ये घडला. रोहित शर्माला पाहून एक छोटा चाहता भावूक झाला आणि ढसाढसा रडू लागला. यानंतर रोहितने स्वतः जाऊन त्याच्या या छोट्या चाहत्याचा आनंद साजरा केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे पहिला एकदिवसीय सामना होणार आहे.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Sourav Ganguly's reaction to Hardik
IPL 2024: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांवर सौरव गांगुली संतापला; म्हणाला, ‘त्याला फ्रँचायझीने नियुक्त केले असून…’,
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

रोहित शर्मा आणि टीम इंडियाचे बाकीचे खेळाडू बरसापारा क्रिकेट मैदानावर सराव करत होते. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी अनेक चाहते सराव क्षेत्राला लागून असलेल्या स्टँडजवळ उभे होते. भारतीय क्रिकेट संघाच्या सरावानंतर एक एक करून सर्व खेळाडू टीम बसकडे जाऊ लागले. रोहित स्टँडजवळून जाताच गर्दीत उभा असलेला त्याचा छोटा चाहता त्याला पाहून जोरजोरात रडू लागला. आपल्या छोट्या चाहत्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून रोहित स्वतः त्याच्याजवळ गेला आणि रडण्याचे कारण विचारले. तेव्हा मुलाने सांगितले की, तो त्याचा आवडता क्रिकेटर आहे.

रोहितने रडणाऱ्या छोट्या चाहत्याला समजावलं

चिमुकल्याच्या त्या प्रतिक्रियेवर रोहित म्हणाला, “मग तो का रडतोय? एक लहान मूल आहे?” असे म्हणत त्याने त्याचे गाल ओढायला सुरुवात केली. आपल्या स्टार क्रिकेटरकडून मिळालेल्या प्रेमाने या चिमुकल्या चाहत्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि त्याचा चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या इतर चाहत्यांनी रोहितकडे सेल्फीची मागणी करण्यास सुरुवात केली. रोहितने कोणालाही निराश केले नाही आणि सेल्फीसाठी पोज दिल्यानंतर तो टीम बसमध्ये चढला.

हेही वाचा: IND vs SL 1st ODI: “टी२०चा कर्णधार अजूनही मीच, हार्दिक ही तात्पुरती सोय…” रोहित शर्माने BCCIला दिला इशारा

गुवाहाटीची खेळपट्टी

गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा होण्याची शक्यता आहे. यामुळे गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे. या खेळपट्टीवर आतापर्यंत एकच एकदिवसीय सामना खेळला गेला. जो भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात २०१८ मध्ये खेळला गेला. त्या सामन्यात भारताने विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली प्रथम क्षेत्ररक्षण निवडले होते. त्यामध्ये विराटने १४० धावा केल्या होत्या. त्याचबरोबर रोहित शर्मा याने नाबाद १५२ धावा केल्या होत्या. यामुळे भारताने ३२२ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स आणि ४७ चेंडू राखतच जिंकले होते.