Team India’s captain Rohit Sharma: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. कॅरेबियन दौऱ्यावर पहिल्यांदा पोहोचलेल्या खेळाडूंपैकी एक म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. टीम इंडिया या दौऱ्याची सुरुवात येथील कसोटी मालिकेने करणार आहे. या दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी२० मालिका होणार आहे, मात्र त्याआधी रोहित शर्माचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

खरं तर, वेस्ट इंडिजमध्ये बीच बॉल खेळताना रोहित शर्माचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो पूर्णपणे क्लीन शेव्हन केलेला दिसत आहे. यामागे काय कारण आहे, हे माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की की तो त्याच्या आहे त्या वयापेक्षा नक्कीच तरुण दिसत आहे. जानेवारी २०२२ मध्येही त्याने दाढी ट्रिम केली होती. त्यावेळी तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता.

रोहित शर्माने तब्बल चार वर्षांनंतर क्लीन शेव्हन केली आहे. यापूर्वी, २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत तो क्लीन शेव्हसह उतरला होता आणि त्या मालिकेत त्याने द्विशतक ठोकले होते. त्यावेळी त्यांनी यामागचे कारण सांगितले की, त्यांची मुलगी समायरा दाढी ठेवल्यावर त्यांच्यासोबत जास्त खेळत नाही. मात्र, यावेळी तसे होणार नाही.

१२ जुलैपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल भारतीय कर्णधार रोहित शर्मासह वेस्ट इंडिजमधील बार्बाडोसला पोहोचला आहे. यशस्वीचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा आणि यशस्वीच्या आधी टीम इंडियाची पहिली तुकडी वेस्ट इंडिजमध्ये पोहोचली होती, ज्यामध्ये अश्विन, जडेजा आणि शार्दुल सारखे खेळाडू उपस्थित होते.

टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​सायकलमधील हा पहिला सामना असेल. याआधी भारत १० दिवसांच्या शिबिरात भाग घेणार आहे. त्याचबरोबर कसोटीपूर्वी टीम इंडिया दोन दिवस सराव सामनाही खेळणार आहे. ५ ते ६ जुलै दरम्यान केन्सिंग्टन ओव्हल येथे सराव सामना खेळवला जाईल. टीम इंडियाने यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलद्वारे एक टेस्ट मॅच खेळली होती, दुसरीकडे वेस्ट इंडिजने शेवटचा टेस्ट मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.

ही आहे दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी

भारत आणि वेस्ट इंडिजच्या संघांनी आतापर्यंत एकूण ९८ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने २२ आणि वेस्ट इंडिजने ३० जिंकले आहेत. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचा मार्ग सोपा नसेल. विशेष म्हणजे, भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या वेळी २०१९ मध्ये आमनेसामने आले होते. त्यानंतर दोन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा २-०ने पराभव केला.

हेही वाचा: ENG vs AUS: वादग्रस्तपणे बाद झालेला बेअरस्टो अन् रागाने पॅट कमिन्सशी केलेले हस्तांदोलन पाहून आठवले कोहली-गंभीर; पाहा Video

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के.एस. भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.