Deepti Sharma First Women highest wicket taker: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी२० विश्वचषकात भारतीय विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याला केपटाऊन येथे सुरुवात झाली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिला पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्यात अपयश आले. नाणेफेक जिंकलेल्या वेस्ट इंडीज संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातून भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने पुनरागमन केले. तर, पुणेकर अष्टपैलू देविका वैद्य हिलादेखील संघात संधी मिळाली.

आजच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू भारताची स्टार गोलंदाज दीप्ती शर्माने शानदार कामगिरी करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. टी२०फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी ती पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे. तिने पूनम यादवचा ९८ विकेट्सचा विक्रम मोडत १०० विकेट्स घेत नवीन विक्रमाची नोंद केली. दीप्ती शर्माही इंग्लंडमध्ये मांकडिंग प्रकरणानंतर फार चर्चेत आली होती. भारताची आघाडीची ऑफस्पिन करणारी फिरकीपटू म्हणून ओळखली जाते. आजच्या सामन्यात एकाचा षटकात दोन विकेट्स घेत तिने नवीन विक्रम केला. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदच्या नावावर आहे. तीने १२५ विकेट्स घेतल्या आहेत.

१४व्या षटकात दीप्ती शर्माचा कहर पाहायला मिळाला. त्याने एका षटकात दोन विकेट्स घेतले. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दीप्तीने शेमन कॅम्पबेलला स्मृती मंधानाकरवी झेलबाद केले. कॅम्पबेलला ३६ चेंडूत ३० धावा करता आल्या. डावात तीन चौकार मारले. यानंतर शेवटच्या चेंडूवर स्टेफनी टेलर पायचीत झाली. ४० चेंडूत ४२ धावा करून ती बाद झाली. त्यानंतर वेस्ट इंडीज डावाच्या शेवटच्या षटकात आणखी एक विकेट्स घेत आपले टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० विकेट्स पूर्ण करत इतिहास रचला. त्या यादीत पूनम यादव ९८, राधा यादव ६७, राजेश्वरी गायकवाड ५८ आणि झुलन गोस्वामी ५६ विकेट्स यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताला विजयासाठी ११९ धावांची आवश्यकता

वेस्ट इंडीजच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली कारण कर्णधार हेली मॅथ्यूज २ धावांवर बाद झाली. त्यानंतर स्टॅफनी टेलर आणि शेमेन कॅम्पबेले यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी झाली. स्टॅफनी टेलरने ४२ धावा तर शेमेन कॅम्पबेलेने ३० धावा केल्या. दीप्ती शर्माने दोघींना एकाच षटकात बाद वेस्ट इंडीजला मोठा धक्का दिला. ठराविक अंतरावर विकेट्स पडत गेल्याने २० षटकात वेस्ट इंडीज केवळ ११८ धावा करू शकला. भारताकडून सर्वाधिक फिरकीपटू दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतल्या तर रेणुका ठाकूर आणि पूजा वस्त्राकार यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.