India vs Australia 1st ODI Highlights: ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडे सामन्यात डीएलएस पद्धतीनुसार भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. पावसामुळे ४ वेळा सामन्यात थांबवण्यात आला आणि त्यामुळे २६ षटकांचा सामना खेळवण्यात आला. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १३१ धावांचे लक्ष्य दिले होते, जे कांगारू संघाने २१.१ षटकांत सहज गाठले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्शने नाबाद ४६ धावांची खेळी केली. तर जोश फिलीपीने ३७ धावांची खेळी केली. तर मॅट रेनशॉने २४ धावांची खेेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक ३८, अक्षर पटेलने ३१ आणि शेवटी नितीश कुमार रेड्डीने १९ धावांची खेळी केली. तर संघातील प्रमुख फलंदाज रोहित शर्मा ८, शुबमन गिल १०, विराट कोहली ० आणि अक्षर पटेल ३१ धावा करत माघारी परतला. भारतीय संघाने पहिल्या डावात २६ षटकांअखेर ९ गडी बाद १३६ धावा केल्या. तर डीएलएस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १३१ धावाचं लक्ष्य देण्यात आलं होतं.
ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का! जोश फिलिपी स्वस्तात परतला माघारी
वॉशिंग्टन सुंदरने जोश फिलिपीला बाद करत माघारी धाडलं आहे.
ऑस्ट्रेलियाला दुसरा मोठा धक्का! मॅथ्यू शॉर्ट स्वस्तात परतला माघारी
अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाला दुसरा मोठा धक्का दिला आहे. मॅथ्यू शॉर्ट स्वस्तात माघारी परतला आहे.
ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का! ट्रॅव्हिस हेड स्वस्तात परतला माघारी
अर्शदीप सिंगने ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का दिला आहे. हेड दुसऱ्याच षटकात ८ धावा करत माघारी परतला आहे.
भारतीय संघाने केल्या १३६ धावा
भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २६ षटकांअखेर ९ गडी बाद १३६ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाला सातवा धक्का! केएल राहुल परतला माघारी
भारतीय संघाला सातवा धक्का बसला आहे. केएल राहुल ३८ धावा करत माघारी परतला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत १२१ धावा केल्या आहेत.
भारताचा निम्मा संघ तंबूत
भारतीय संघाला पाचवा धक्का बसला आहे. अक्षर पटेल ३१ धावा करत माघारी परतला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ८४ धावा केल्या आहेत.
पाऊस थांबला, सामन्याला पुन्हा एकदा सुरूवात! किती षटकांचा खेळ होणार?
या सामन्यातील पहिल्या डावात ४ वेळा पावसामुळे खेळ थांबला आहे. हा डाव २६ षटकांचा असणार आहे.
भारतीय संघाला चौथा धक्का! श्रेयस अय्यर परतला माघारी
भारतीय संघाला चौथा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरदेखील अवघ्या ११ धावा करत माघारी परतला आहे.
पावसामुळे खेळ थांबला
भारताचे टॉप ३ फलंदाज तंबूत! RO-KO नंतर शुबमन गिल परतला तंबूत
भारतीय संघाला ३ मोठे धक्के बसले आहेत. विराट कोहली शून्यावर, रोहित शर्मा ८ धावांवर माघारी परतल्यानंतर शुबमन गिल अवघ्या १० धावांवर माघारी परतला आहे.
पुनरागमनात विराट-रोहित फ्लॉप! कोहली शून्यावर बाद
भारतीय संघाला सुरूवातीलाच २ मोठे धक्के बसले आहेत. रोहित शर्मा ८ धावांवर माघारी परतल्यानंतर विराट कोहली पुनरागमनानंतर पहिल्याच सामन्यात खेळताना विराट कोहली कोहली शून्यावर माघारी परतला आहे.
भारतीय संघाला पहिला मोठा धक्का! रोहित शर्मा स्वस्तात बाद
भारतीय संघाला चौथ्या षटकात पहिला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा अवघ्या ८ धाव करत माघारी परतला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत १ गडी बाद १३ धावा केल्या आहेत.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११
भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग</p>
ऑस्ट्रेलिया संघ: ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिपी (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड