India vs Bangladesh: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १६८ धावा केल्या होत्या. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सैफ हसनने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीमुळे बांगलादेशचा संघ विजयापासून वंचित राहिला. भारतीय संघाने हा सामना ४१ धावांनी आपल्या नावावर केला.
Asia Cup, 2025
India
168/6 (20.0)
Bangladesh
127 (19.3)
Match Ended ( Day – Super Four – Match 4 )
India beat Bangladesh by 41 runs
हा सामना भारतीय संघाने ४१ धावांनी आपल्या नावावर केला आहे. यासह आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
India vs Bangladesh Live: कडक! अक्षर पटेलचा बाऊंड्री लाईनवर भन्नाट कॅच
जसप्रीत बुमराहच्या षटकात अक्षर पटेलने बाऊंड्री लाईनवर भन्नाट कॅच घेतला आहे. यासह त्याने सैफ हसनला ६९ धावांवर बाद करत माघारी धाडलं आहे.
IND vs BAN Live: भारतीय संघ मजबूत स्थितीत! कुलदीप यादवने दिले लागोपाठ २ धक्के
भारतीय संघ या सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचला आहे. बांगलादेशचे ८ फलंदाज तंबूत परतले आहेत. आधी हुसेन आणि मग साकिब देखील कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतले आहेत.
India vs Bangladesh Live: बांगलादेशला सहावा धक्का! मोहम्मद सैफुद्दीन बाद होऊन परतला माघारी
बांगलादेशला सहावा मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद सैफुद्दीन वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर ४ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला आहे.
या डावातील १३ व्या षटकात सैफने १ धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण सूर्यकुमार यादवने रॉकेट थ्रो मारून जाकीर अलीला बाद करत माघारी धाडलं.
India vs Bangladesh Live: वरूणच्या फिरकीवर शमीमची बत्तीगुल; बांगलादेशचे ४ फलंदाज तंबूत
बांगलादेशला चौथा मोठा धक्का बसला आहे. ७४ धावसंख्येवर शमीम हुसेन शून्यावर माघारी परतला. त्याला वरूण चक्रवर्तीने बाद करत माघारी धाडलं आहे.
Ind vs Ban Live: बांगलादेशचे टॉप ३ फलंदाज तंबूत
बांगलादेशला डावातील १० व्या षटकात तिसरा मोठा धक्का बसला आहे. दमदार फॉर्ममध्ये असलेला तोहिद हृदोय अवघ्या ७ धावांवर माघारी परतला आहे. बांगलादेाशला अजूनही १०४ धावांची गरज आहे.
India vs Bangladesh Live Score: बांगलादेश दुसरा मोठा धक्का
बांगलादेशला दुसरा मोठा धक्का बसला आहे. दमदार फटकेबाजी असलेला परवेज हुसेन इमॉन २१ धावा करत माघारी परतला आहे.
IND vs BAN Live Score: ५ षटकांचा खेळ पूर्ण
दुसऱ्या डावातील ५ षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. बांगलादेशला ५ षटकांअखेर १ गडी बाद ३५ धावा करता आल्या आहेत. बांगलादेशला विजयासाठी १५ षटकात अजूनही १३४ धावा करायच्या आहेत.
जसप्रीत बुमराहने तांझिड हसनला बाद करत बांगलादेशला पहिला दणका दिला. चेंडू फ्लिक करायचा तांझिडचा प्रयत्न हवेत उंच गेला. शिवम दुबेने चांगला झेल टिपला.
IND vs BAN Live: पहिल्या डावात भारतीय संघाने केल्या १६८ धावा
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने १६८ धावा केल्या आहेत. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावा करायच्या आहेत.
भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. तिलक वर्माही अवघ्या ५ धावा करत माघारी परतला आहे. भारतीय संघाने १५ व्या षटकात १३० धावांचा पल्ला गाठला आहे.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. तो या सामन्यात ५ धावा करून माघारी परतला आहे.
भारतीय संघाला दुसरा मोठा धक्क बसला आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शिवम दुबे २ धावांवर माघारी परतला आहे.
गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माने या सामन्यातही अर्धशतक झळकावलं आहे. त्याने २५ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शुबमन गिल २९ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ७७ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाने पाचव्या षटकात ५० धावांचा पल्ला गाठला आहे. अभिषेक शर्मा ३० धावांवर तर शुबमन गिल २४ धावांवर नाबाद आहे.
बांगलादेशने सुरुवातीच्या दोन षटकात शिस्तबद्ध मारा करत शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा जोडीला मोठे फटके खेळण्यापासून रोखलं.
IND vs BAN Toss Playing 11: भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया चषक सुपर फोर टप्प्यातील सामना खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशला मोठा धक्का लागला आहे. ...सविस्तर बातमी
भारतीय संघाने अंतिम अकरात कोणताही बदल केलेला नाही मात्र बांगलादेशने संघात घाऊक बदल केले आहेत. नियमित कर्णधार लिट्टन दास दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही.
भारतीय संघ
शुबमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
बांगलादेश संघ
सैफ हसन, तांझिड हसन, परवेझ होसेन इमॉन, तौहिद हृदोय, जेकर अली (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शामिम होसेन, रिशाद होसेन, नसुम अहमद, तांझिम हसन साकीब, मोहम्मद सैफूद्दीन, मुस्ताफिझूर रहमान.
बांगलादेशने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा कर्णधार लिट्टन दास दुखापतीमुळे या लढतीत खेळू शकणार नाही. जेकर अली बांगलादेशचं नेतृत्व करत आहे. भारताने पाकिस्तानविरुद्धचा संघ कायम ठेवला आहे.
भारत जिंकल्यास श्रीलंकेचं आव्हान संपष्टात येणार
भारतीय संघाने आज बांगलादेशला नमवलं तर श्रीलंकेचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. सुपर फोर गटात श्रीलंकेला बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी अंतिम फेरी गाठणं अवघड झालं आहे. भारतीय संघाचा विजय त्यांना गाशा गुंडाळायला लावू शकतो.
पाचव्या क्रमांकासाठी संजूला पसंती
अभिषेक वर्माच्या बरोबरीने शुबमन गिल सलामीला येत तडाखेबंद भागीदारी करत असल्याने संजू सॅमसमनला मधल्या फळीत खेळणं भाग आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव तीन आणि तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतात. संजूसाठी पाचवा क्रमांक नवीन आहे. भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डुश्काटा यांनी संजू या क्रमांकावर चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला.
Vaibhav Suryavanshi: षटकारांचा बादशाह! वैभव सूर्यवंशीने मोडला मोठा विक्रम, युथ वनडेमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
दुबईत उकाडा आणि दव
दुबईतलं तापमान उष्ण आणि दमट असून, दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी या वातावरणात खेळणं आव्हानात्मक असेल. तापमान ३३ ते ३५ दरम्यान असून, आर्द्रता ४५ टक्के आहे. संध्याकाळनंतर मैदानात दव पडण्याची शक्यता आहे. दवामुळे चेंडू ग्रिप करणं अवघड होतं आणि बॅट्समनकरता समीकरण सोपं होतं. यामुळे टॉस जिंकून कॅप्टन बॉलिंगचा निर्णय घेतात.
कोणताही संघ भारताला हरवू शकतो- बांगलादेशचे प्रशिक्षक
'टी२० प्रकारात त्या विशिष्ट दिवशी जो संघ सर्वोत्तम खेळतो तो जिंकतो त्यामुळे सुपर फोर फेरीत दाखल झालेला कोणताही संघ भारताला हरवू शकतो. भारतीय संघ निश्चितच ताकदवान आहे. त्यांना हरवण्यासाठी आम्हाला बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करावी लागेल. इतिहास त्यांच्या बाजूने आहे पण आम्ही आधी केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करू', असं बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक आणि वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू खेळाडू फिल सिमन्स यांनी सांगितलं.
दुबईची खेळपट्टी फिरकीला अनुकूल
दुबईतली खेळपट्टी संथ स्वरुपाची असते. फिरकीपटूंना अनुकूल ठरते. या पार्श्वभूमीवर दोन्ही संघ अंतिम अकरात अधिकाअधिक फिरकीपटूंचा समावेश करण्याची शक्यता आहे.
बांगलादेशविरुद्धच्या लढतीत भारतीय संघ संघात बदल करून काही प्रयोग करणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे. प्राथमिक फेरीच्या लढतीत ओमानविरुद्ध भारताने जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांच्याऐवजी अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी अंतिम अकरात संधी दिली होती. अंतिम फेरी गाठण्यासाठी जास्तीत जास्त सामने जिंकणं आवश्यक आहे. मात्र त्याचवेळी वर्कलोड मॅनेजमेंट सांभाळणंही गरजेचं आहे. भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धचा सुपर फोर फेरीचा सामना जिंकला आहे. आज बांगलादेश आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या लढती बाकी आहेत.
बांगलादेश स्टार खेळाडूंविना
प्रदीर्घ काळानंतर बांगलादेशचा संघ शकीब उल हसन, मुशफकीर रहीम या त्यांच्या स्टार खेळाडूंविना खेळत आहे. शकीब आणि मुशफकीर वर्षानुवर्षे बांगलादेश संघाचा आधारवड होते. मात्र या खेपेस बांगलादेशने नव्या दमाचा संघ पाठवला आहे.
बांगलादेशसाठी अप्राप्य स्पर्धा
बांगलादेशने आतापर्यंत एकदाही आशिया चषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलेलं नाही. १६ वेळा स्पर्धेत सहभागी होऊनही बांगलादेशला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. यंदाही प्राथमिक फेरीत त्याला दमदार खेळ करता आला नाही. मात्र सुपर फोरच्या पहिल्याच लढतीत बांगलादेशने श्रीलंकेला पराभवाचा दणका दिला. आज त्यांच्यासमोर बलाढ्य भारतीय संघाचं आव्हान आहे.