Ind vs Pak Live Match Score, Asia Cup 2025: आज आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आज आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिमयवर रंगणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यूएईचा एकतर्फी पराभव केला आहे. तर पाकिस्तानने पहिल्या लढतीत ओमानचा पराभव केला आहे. हा सामना सुपर ४ मध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ कोणावर भारी पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Live Updates
16:04 (IST) 14 Sep 2025

पाकिस्तानचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळून ठाण्यात ठाकरे गटाचे आंदोलन; पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी, मोदींना पाठविले कुंकू

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळू नये अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. ...सविस्तर वाचा
13:12 (IST) 14 Sep 2025

Profit vs Patriotism: भारतीय संघ आशिया चषकात पाकिस्तानसोबत का खेळत आहे?

भारतीय संघ आशिया चषकात पाकिस्तानसोबत का खेळत आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.loksatta.com/krida/profit-vs-patriotism-why-team-india-is-playing-against-pakistan-in-asia-cup-2025-ind-vs-pak-amd-2000-5371250/

13:10 (IST) 14 Sep 2025

IND vs PAK Live: …हा तर अदृश्य बहिष्कार

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषक स्पर्धेचा सामना आज रंगणार असला तरी पदाधिकारी, प्रतिष्ठितांनी या लढतीकडे सामान्य प्रेक्षकांप्रमाणे पाठच फिरवली आहे

पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.loksatta.com/krida/asia-cup-india-pakistan-match-controversy-prominent-figures-boycott-sports-news-amy-95-5370744/

13:08 (IST) 14 Sep 2025

IND vs PAK Live: धनाढ्य बोर्ड, गर्भश्रीमंत खेळाडू पण पाकिस्तानवर बहिष्कार टाकायची धमक का नाही?

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआय अर्थात ‘बोर्ड फॉर क्रिकेट कंट्रोल इन इंडिया’ यांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल समोर आला. वर्षभरापूर्वी बीसीसीआयच्या तिजोरीत २०,६८६ कोटी रुपये असल्याचं स्पष्ट झालं.

ही पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.loksatta.com/krida/richest-cricket-board-bcci-super-rich-indian-cricketers-but-cant-take-stand-not-to-play-against-pakistan-psp-88-5370453/

12:50 (IST) 14 Sep 2025

IND vs PAK Live: दुबईत सामन्यावेळी कसं असेल हवामान?

हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता तर फारच कमी आहे. पण खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. ॲक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार, तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. त्यामुळे खेळाडूंना उष्ण वातावरणाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खेळाडूंना थकवा येऊ शकतो.

12:05 (IST) 14 Sep 2025

'अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त', संजय राऊतांची जहाल टीका; भारत-पाकिस्तान सामन्यांवरून जुंपली

Sanjay Raut on India-Pakistan Match: भारत-पाकिस्तान सामन्याकडे खेळाच्या दृष्टीकोनातून पाहायला हवे, असे विधान अजित पवार यांनी केले होते. यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. ...सविस्तर वाचा
12:04 (IST) 14 Sep 2025

"आपल्या टीमला पाकिस्तानविरोधात मॅच खेळायची नाही, पण..", जय शाह यांचे नाव घेत संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut on Team India: भारतीय संघावर आजचा पाकिस्तान विरोधातील सामना खेळण्यासाठी दबाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...वाचा सविस्तर
12:02 (IST) 14 Sep 2025

IND vs PAK Live: कसा आहे दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रेकॉर्ड पाहिला तर भारताचा संघ नेहमीच आघाडीवर राहिला आहे. दोन्ही संघ टी- २० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान १० सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला अवघे ३ सामने जिंकता आले आहेत

11:46 (IST) 14 Sep 2025

IND vs PAK Live: या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११?

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. गेल्या सामन्यात संधी मिळालेल्या खेळाडूंना या सामन्यातही संधी दिली जाऊ शकते.

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती