scorecardresearch

IPL 2008 स्पर्धेसाठी सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू सध्या काय करतायत?; जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेला १४ वर्षे झाली असून या कालावधीत अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळले आहेत.

IPL 2022 Mega Auction Likely to Take Place in February says Report
आयपीएल २०२१ मेगा ऑक्शन

आयपीएल स्पर्धेला १४ वर्षे झाली असून या कालावधीत अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळले आहेत. या स्पर्धेत नवोदित खेळाडूंना आपल्या कामगिरीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. तर काही दिग्गज खेळाडूंच्या फॉर्मला काळानुरूप उतरती कळा लागली आणि आयपीएलमधून बाहेर गेले. यात काही खेळाडू असे आहेत की, आयपीएल सुरु झाल्यानंतर त्यांच्यासाठी महागडी बोली लागली होती.

इरफान पठाणने भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी केली. टी २० विश्वचषक विजयी संघात होता. तसेच अंतिम सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे २००८ आयपीएल लिलावात त्याला चांगलाच भाव मिळाला. पंजाब किंग्स संघाने महागडी बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. त्याने २००८ आयपीएल स्पर्धेतील १४ सामन्यात २१.२० धावगतीने १५ गडी बाद केले होते. त्याचबरोबर ११२.९३ च्या धावगतीने १३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने दिल्ली डेअरडेविल्स आमि चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल सामने खेळला. २०१७ मध्ये गुजरात लायन्सकडून खेळला आणि आयपीएलमधील करिअर संपुष्टात आलं. त्याने आयपीएलमध्ये एकूण १०३ सामने खेळला आणि ८० गडी बाद केले. तसेच १,१३९ धावा केल्या. सध्या इरफान समालोचन करत आहे.

Video: “क्या बात है…”; युजवेंद्र चहलने पत्नीसोबत केला जबरदस्त डान्स

इरफाननंतर वेगवान गोलंदाज इशांत शर्माला आयपीएल २००८ मध्ये कोलकाता नाइटराइडर्स सर्वाधिक बोली लावत खरेदी केलं होतं. या स्पर्धेत इशांतने १३ सामन्यात फक्त ८ गडी बाद केले होत. त्यानंतर २०१३ मध्ये सनराइजर्स हैदराबादकडून खेळताना चांगली कामगिरी केली आणि १५ गडी बाद केले. तर २०१८ मध्ये अनसोल्ड राहिला. २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने १.१ कोटी रुपयात त्याला खरेदी केलं. इशांत शर्मा भारतीय कसोटी संघातील नियमित खेळाडू आहे.

IPL 2021: मुंबई इंडियन्सने तीन खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये केला सन्मान; सचिन तेंडुलकरने इशानच्या…

२००७ मध्ये भारताला टी २० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्र सिंह धोनी २००८ आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. धोनीने चेन्नई सुपर किंग्सला २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएल चॅम्पियनशिप मिळवून दिली होती. धोनीने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आयपीएलमध्ये खेळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-10-2021 at 19:22 IST

संबंधित बातम्या