IPL 2025 Ajinkya Rahane Statement on KKR Defeat vs PBKS: केकेआर संघाला आयपीएल इतिहासातील लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. पंजाब किंग्सने आयपीएल इतिहासातील सर्वात छोट्या धावसंख्येचा बचाव केला आहे. या कमी धावसंख्येच्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जचा संघ १५.३ षटकांत फक्त १११ धावांवर गारद झाला. यानंतर, संपूर्ण केकेआर संघही १५.१ षटकांत केवळ ९५ धावांवर सर्वबाद झाला. या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठं वक्तव्य केलं आहे.

पंजाब किंग्जचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी करून सामना फिरवला. पण सामन्याचा टर्निंग पॉइंट केकेआर कर्णधार अजिंक्य रहाणेची चूक ठरली. या चुकीमुळे संपूर्ण संघाला मोठी किंमत मोजावी लागली आणि केकेआरने मात्र जिंकलेला सामना गमावला. सामन्यानंतर रहाणेने आपली चूक मान्य केली आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारली.

PBKS vs KKR सामन्याचा काय ठरला टर्निंग पॉईंट?

केकेआरच्या डावादरम्यान, ८वे षटक पंजाब किंग्जचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने टाकले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, रहाणे स्लॉग स्वीप खेळायला गेला पण तो चुकला आणि चेंडू त्याच्या मांडीला लागला. चहलने अपील केल्यावर पंचांनी त्याला बाद दिले. रहाणेने दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या अंगक्रिश रघुवंशीशी चर्चा केली आणि रिव्ह्यू न घेता पॅव्हेलियनमध्ये परतला.

थोड्या वेळाने रिव्ह्यू दाखवण्यात आला आणि बॉल ट्रॅकिंगवरून हे स्पष्टपणे दिसून येत होते की चेंडूचा इम्पॅक्ट आऊच साईडला होता आणि रहाणे नाबाद होता. ही चूक संपूर्ण संघाला महागात पडली. कारण अजिंक्य रहाणेने विकेट गमावल्यानंतर संपूर्ण केकेआर संघ बेजबाबदारपणे खेळत फक्त ९५ धावांवर बाद झाला.

सामन्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, “स्पष्टीकरण देण्यासारखं काहीच नाही. आपण सर्वांनी मैदानावर काय घडलं. आमचे प्रयत्न अपुरे पडले. मी याची पूर्ण जबाबदारी घेतो, मी चुकीचा शॉट खेळलो, तरी विकेट मिसिंग होती. मी अंगक्रिश रघुवंशीबरोबर विकेटबद्दल बोललो पण नक्की बाद आहे आहे नाबाद याबाबत त्याला शंका होता. तो म्हणाला कदाचित अंपायर्स कॉल असू शकतो. मला त्यावेळी कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. मलाही खात्री नव्हती. याबाबतच आम्ही चर्चा करत होतो, याचा पूर्ण दोष मी माझ्यावर घेतो.”

श्रेयस पुढे म्हणाला की, “आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि पंजाब किंग्जच्या मजबूत फलंदाजीला फक्त १११ धावांवर रोखले. पण एक फलंदाजी युनिट म्हणून या पराभवाची आम्ही सर्वच जबाबदारी घेतो.”