Akash Madhwal Banned From Local Cricket: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने अप्रतिम कामगिरी केली आहे. बुधवारी, २४ मे रोजी खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध केवळ पाच धावांत पाच बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये एका डावात पाच विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. अशात आता आकाशच्या भावाने त्याच्याबद्दल काही महत्वाचे खुलासे केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधवालचा प्रवास खूप रोमांचक राहिला आहे. २०१८ पर्यंत तो उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी येथे टेनिस बॉल क्रिकेट खेळत असे. आपल्या खेळाने त्याने तेथील स्थानिक क्रिकेटमध्ये दहशत पसरवली होती. आकाशने अप्रतिम खेळ दाखवला तेव्हा धांधेरा (रुरकीजवळचे शहर) मधील सर्वजण त्याच्या भावाचे आणि आईचे अभिनंदन करण्यासाठी आले. दिवसभर अभिनंदन करणाऱ्यांची वर्दळ होती.

इंडिया टुडेशी खास बातचीत करताना आकाशचा भाऊ आशिषने सांगितले की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावाला कशी मदत केली. ज्यामुळे त्याला दडपणाखाली चांगला खेळ करण्यास मदत झाली.आशिष म्हणाला, “रोहित भाईची एक चांगली गोष्ट म्हणजे तो आपल्या खेळाडूंना संधी देतो. तो आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि त्यांना पाठिंबा देतो. नवीन खेळाडूला संघातील स्थानाबद्दल नेहमीच भीती वाटत असते. ती भीती रोहितने दूर केली आहे आणि आकाश आता परफॉर्म करत आहे.”

हेही वाचा – VIDEO: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलपूर्वी रोहित शर्माने आपल्या सहकाऱ्यांचे केले कौतुक; म्हणाला, “प्रत्येक प्रसंगी एका…”

आकाशचा मोठा भाऊ आशिषने इंडिया टुडेला पुढे सांगितले की, ‘२०२२ मध्ये जेव्हा सूर्यकुमार यादव जखमी झाला आणि २-३ सामने बाकी होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सने सूर्याच्या जागी आकाशची निवड केली. अशाप्रकारे त्याने आकाशवर विश्वास व्यक्त केला की त्याची आयपीएल २०२३ च्या संघात निवड होईल. रोहितने त्याला सांगितले होते की, त्याला आयपीएल २०२३ मध्ये खेळण्याची संधी मिळेल.”

आशिष आकाशपेक्षा एक वर्ष, १२ दिवसांनी मोठा आहे. दोघेही एकत्र खेळत मोठे झाले आहेत. अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर आकाशला नोकरी लागली होती. परंतु त्याच्या आयुष्यातील क्रिकेटच्या प्रेमापासून दूर राहू शकला नाही. तो परिसरात स्थानिक स्पर्धा खेळत राहिला. आकाशलाही या स्पर्धांमध्ये अनेक संधी मिळाल्या.आकाशच्या मित्राने सांगितले, “जेव्हा तो इंजिनीअरिंगनंतर नोकरी करत होता, तेव्हा लोक रोज यायचे आणि म्हणायचे की आज जॉबला जाऊ नको, आमच्यासाठी एक मॅच खेळं, आम्ही तुला पैसे देऊ. इथून तो लेदर बॉल क्रिकेटकडे वळला. हे त्याच्या उत्तराखंडसाठी ट्रायल दिल्यानंतर घडले.”

हेही वाचा – IPL 2023: फायनलपूर्वी एमएस धोनीने घेतली पथिराणा कुटुंबाची भेट, मथीशाची बहीण फोटो शेअर करत म्हणाली, “मल्ली सुरक्षित…”

व्यवसायाने बिझनेसमॅन असलेल्या आशिषने सांगितले की, “एकावेळी आकाश इतका लोकप्रिय झाला होता, की स्थानिक लीगने त्याच्यावर बंदी घालण्यास सुरुवात केली.त्याला इथे कोणी खेळू देत नव्हते. त्याच्या गोलंदाजीची खूप भीती होती. त्यामुळे त्यांनी त्याला स्थानिक स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली. भीतीचे वातावरण होते. आकाश रुरकीच्या बाहेर खेळायचा. पण हो, त्याचे टेनिस बॉल क्रिकेटचे दिवस संपले. तो आता खूप, खूप आनंदी आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash madhwals brother ashish revealed that his brother was banned from local cricket vbm
First published on: 26-05-2023 at 12:29 IST